अकोला : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत देशवासीयांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देताना दिसत आहेत. परंतु, बॉलिवूडमधील काही बडे कलाकार दरवर्षीप्रमाणे यंदाही मतदान करू शकणार नाहीत. जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार.
अभिनेता अक्षय कुमार याचा जन्म जरी पंजाबमधील अमृतसर येथे झाला असला तरीही अधिकृतरित्या तो भारताचा नागरिक नाही. त्याच्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असून कॅनडाने त्याला तिकडचे नागरिकत्व दिले आहे. भारतीय नियमाप्रमाणे दोन देशांचे नागरिकत्व ठेवण्यास कोणत्याही नागरिकाला मान्यता नाही. त्यामुळे अक्षयनं भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून कॅनडाचे नागरिकत्व अबाधित ठेवले. त्यामुळे अक्षय मतदारांना आवाहन करताना दिसत असला तरी तो स्वत: मात्र, मतदान करू शकत नाही.
दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी अभिनेत्री आलिया भट्टदेखील भारतात मतदान करु शकत नाही. तिची आई सोनी राजदान ब्रिटीश नागरिक आहे त्यामुळे आलियाकडेसुद्धा ब्रिटीश पासपोर्ट आहे.
अभिनेत्री दीपिका पाडुकोण हिचा जन्म डेन्मार्कची राजधानी असलेल्या कोपेनहेगनमध्ये झाला. त्यामुळे दीपिकाकडे डॅनिश पासपोर्ट आहे. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पाडुकोण यांची मुलगी दीपिका हिचा जन्म जरी डेन्मार्कमध्ये झाला असला तरी ती बेंगळुरूमध्ये लहानाची मोठी झाली आहे. परंतु, तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नसल्यानं ती निवडणुकीत मतदान करू शकत नाही.
अधिक वाचा : पैसा हाच अजय देवगणचा धर्म: विन्ता नंदा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 2