वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शिक्षणाचे जनक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण गावातून रथामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेसह ११ एप्रिल रोजी मोठी उस्थाहात शोभायात्रा काढण्यात आली आहे. सर्वप्रथम जयंतीदिनी विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १० ते १०.३० पर्यत भव्य मोटर सायकल रॅली काढण्यात आली. दुसऱ्या सत्रात ११ ते 3 पर्यत युवकांकडून भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिरामध्ये शेकडो युवकांनी रक्तदान केले आहे. यावेळी डॉ हिम्मतराव घाटोळ, बळीराम घाटोळ, शिवलाल् घाटोळ, दिपक मसने, मनोहर सोनटक्के, अरूण हुसे, दत्ता मानकर, सचिन धनोकार, संदीप घाटोळ, सदानंद भुस्कुटे, संदीप जढाळ, विजय सोनटक्के, तसेच सर्व माळी समाज युवक मोठया संख्येने उपस्थीत होते. त्यानंतर तिसऱ्या सत्रात ४ ते १० भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत सिनेअभिनेते संतोष लोखंडे यांनी हुबेहूब महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा साकारली होती. ही वेशभूषा शोभायात्रेत आकर्षण ठरले होते. यांच्या सोबत प्रत्येकांनी सेल्फी घेण्याचं मोह आवरला नाही. ही शोभायात्रा यशस्वी करण्याकरिता सार्वजनिक महात्मा ज्योतिबा फुले उत्सव समितीचे पदाधीकारी, कार्यकर्ते ,सर्व माळी समाज युवक, गावतील सर्व जाती धर्माचे नागरीक मोठया संख्येने उपस्थीत होते त्याच प्रमाने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, सार्वजनिक महात्मा फुले उत्सव समिती कडून योग्य असे सहकार्य लाभले त्यामुळे ही शोभायात्रा शांततेत पार पडली आहे.
अधिक वाचा : वाडेगावतील दोन घरात चोरी करण्याचा प्रयत्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola