अकोला(प्रतिनिधी)- अकोल्यात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा स्थानिक डाबकी रोड वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानवर ठेवण्यात आली होती.यावेळी सभा सुरू होण्यापूर्वी अचानक सभा मंडप कोसळल्याने आयोजकांची एकच धांदल उडाली होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेपुर्वी आयोजकानी मात्र सारवासारव करीत पुन्हा नियोजन केले होते.यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसून येन सभा सुरू होण्यापूर्वी ही घटना झाल्याने कुठला गोंधळ उडाला होता.