तेल्हारा (आनंद बोदडे) : पातूरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी बाभुळगाव येथील प्रवीण दांडगे वार्ताहराला अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली आणि लोकशाहीच्या चौथ्या खांबाला घाला घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे पत्रकारांनी निषेध नोंदविला.
सविस्तर वृत्त असे की पोलीस स्टेशन पातूर अंतर्गत येत असलेल्या बाभुळगाव येथे पत्रकार प्रवीण दांडगे यांच्या पत्नी सोबत एका युवकाने वाद घालून भांडण केले त्या प्रकरणी दिनांक 26 मार्चला पातुर स्थानिक पत्रकारांनी सर्व पत्रामध्ये ठाणेदाराने तीन तास तक्रारकर्त्याना बसून ठेवलयाची बातम्या प्रकाशित केल्या होत्या आणि उशिरा गुन्हा दाखल केला. असे वृत्त प्रकाशित झाल्यामुळे पातूर पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांचे पित्त खवळल्यामुळे त्यांनी पो कॉ श्रीकांत जायभाये यांना प्रवीण दांडगे यांना बोलावण्यास सांगितले आणि प्रवीण दांडगे आपल्या पत्नीसह पातूर पोलीस स्टेशन मध्ये आले असता त्यांना पकडून अश्लील जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली.
सदर मारहाण होत असताना पत्रकार दांडगे यांच्या पत्नीने विनवणी केली असता ठाणेदार गुल्हाने यांनी त्यांच्या पत्नीला सुद्धा अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी प्रवीण दांडगे यांनी दिनांक 26 मार्च 2019 ला अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.
सदर प्रकरणाबाबत तेल्हारा तालुक्यातील पत्रकारांनी ठाणेदार गजानन गुल्हाने याच्यावर कारवाईची मागणी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे केली यावेळी पञकार अनंत अहेरकर, सत्यशिल सावरकर,विद्याधर खुमकर, आनंद बोदडे, पंकज भारसाकळे, रक्षीत बोदडे, दिपक दारोकार , सिध्दार्थ गवारगुरु , अमीत काकड आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंगणा येथे विहिरीतील गाळ काढतांना २८ वर्षीय युवकाचा मृत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola