अभिनेत्री दीपिका पदुकोण हीने आपल्या चित्रपटात काम करावे किंवा आपल्या कथेतील भूमिकेला दीपिकाच न्याय देऊ शकते, हे खरं तर दिग्दर्शकांना वाटणे सहाजिकच आहे. कारण दीपिकाने आजपर्यंत केलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याच आहेत. अगदी ‘ओम शांती ओम’, ‘लव आज कल’, ‘कॉकटेल’ ते अलिकडच्या काळातील ‘रामलीला’, ‘बाजीवराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘पिकू’ अशा प्रत्येकच चित्रपटात वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये स्वतःला आजमावल्यानंतर दीपिका एका संवेदनशील भूमिकेतून आपल्याला भेटणार आहे.
या संवेदनशील भूमिकेतील दीपिकाचा पहिला लूक सध्या व्हायरल होत आहे. ही भूमिका आहे अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवाल या तरुणीची. लक्ष्मी च्या जीवनावर आधारीत ‘छपाक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात लक्ष्मीची भूमिका दीपिकाने साकारली आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर दीपिकाने आपल्या सोशल मिडीयावर शेअर केले आहे. मेघना गुलजार या ‘छपाक’चे दिग्दर्शन करत आहे.
लक्ष्मीच्या भूमिकेत स्वतःला जगासमोर आणताना दीपिका म्हणते, ‘या चित्रपटात साकारत असलेली मालतीची भूमिका माझ्यासोबत आयुष्यभर राहणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात झाली आहे.’
A character that will stay with me forever…#Malti
Shoot begins today!#Chhapaak
Releasing-10th January, 2020.@meghnagulzar @foxstarhindi @masseysahib pic.twitter.com/EdmbpjzSJo
— Deepika Padukone (@deepikapadukone) March 25, 2019
‘मालती’च्या भूमिकेत दीपिकाचा चेहरा अॅसिड हल्ला झालेल्या तरुणीसारखाच दिसत आहे. अॅसिड हल्ला झाल्यानंतर लक्ष्मीने स्वतःला सावरत कशाप्रकारे संघर्ष केला, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला हे चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी दीपिकासोबत प्रमुख भूमिकेत दिसेल. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 ला प्रदर्शित होईल.
अधिक वाचा : बॉलिवूडचे ‘करण-अर्जुन’ झळकणार एकत्र
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola