अकोला (प्रतिनिधी) : अकोला जिल्हयामध्ये दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. आगामी लोकसभेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने नागरीकांमध्ये निवडणूकीमध्ये मतदान करण्याचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा स्तरीय स्विप कोर समितीच्या विविध विभागांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.
जिल्हयातील मतदार सक्षम बनविणे, स्त्रि-पुरुष मधिल तफावत दुर करणे, मतदानाची टक्केवारी वाढविणे, निवडणूकी बाबत नागरीक जागरुक होऊन अधिक सजग व्हावा व देशातील लोकशाही बळकट होऊन तरुण, महिला, दिव्यांग, ग्रामीण व आदीवाशी क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढावा याकरिता जिल्हयात जिल्हा स्विप पॅल्न तयार करुन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे अध्यक्षेत खाली निवडणूक आयोगाचे निर्देशाप्रमाणे जिल्हास्तरीय कोर समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी यांचे दालनात घेण्यात आली
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी शिवाजी डावभट, स्विप समितीच्या सहाययक नोडल अधिकारी वर्षा खोबरागडे, तहसिलदार श्री लोणारकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमोर, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, कौशल्य विकास विभागाचे सहाययक संचालक दत्तात्रय ठाकरे, आकाशवाणीचे केंद्र निदेशक विजय दळवी, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे अध्यक्ष प्रकाश अवचार, देविदास चव्हाण, दिव्यांग कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष संजय बरडे, सचिव मो. अजीज, रविंद्र सिरसाट, सुधिर कडू आदी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
चुनाव पाठशाळाच्या माध्यमातून बि.एल.ओ. मार्फत बुथ लेव्हलवर समाजातील विविध घटकांमार्फत साक्षरता मंडळ तयार करुन मतदानाबाबत नागरीकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात येणार आहे. तसेच बि.एस.एन.एल., विद्युत विभाग, एस.टी.महामंडळ, पोलीस विभाग, शिक्षक संघटना यांचे मार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. समाज कल्याण, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, यांचे मार्फत ग्रामीण पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचे माध्यमातून घरोघरी भेटी देवून मतदान करण्याबददल जनजागृती करण्यात येणार आहे.
आकाशवाणी वरुन मतदानाविषयी जानजागृती करणारे जिंगलस प्रसारीत करण्यात येणार आहे. तसेच एस.टी.महामंडळाच्या वाहकाद्वारे प्रत्येक प्रवाश्याला टिकीट देतांना तसेच पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मतदान करण्याबाबत प्रवृत्त करावे असा अभिनव प्रयोग करण्यात यावा असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा : वाण फाऊंडेशनची जागतिक वनदिनानिमित्य अनोखी रंगपंचमी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola