पातुर (सुनील गाडगे)- पातुर शहरात सर्वत्र चाललेला रंगपंचमीचा उत्सव शांततेत पार पडत असतांना काही विघ्नसंतोषींकडुन एन काल सायंकाळी 8 वा. सुमारास जुने बस स्टॅंड परिसरात तुंबळ हाणामारी झाल्याने एक दंगलसदृष परिस्थीती निर्माण झाल्याने एकच खळबळ माजली होती. सदर प्रकाराने घाबरलेल्या व्यवसायीकांनी काही वेळातच आपआपली प्रतिष्ठाने बंद केल्यामुळे गावात अफवांना पेव फुटला होता.वेळीच पोलीसांनी मध्यस्थी करुन परिस्थीती नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
सदर प्रकरणाची हकीकत अशी की फिर्यादी नौशाद उर्फ शाहनवाज खान हुसेन खान रा.बैदपुरा अकोला हा पातुर येथील वाशीम रोडवर असलेल्या किसान धाब्यावर काल जेवण करण्यासाठी गेला असता काळी-पिवळी वाला रफीक व त्याचे अन्य दोन साथीदार यांचेसोबत वाद झाला.त्यानंतर फिर्यादी पातुरहुन अकोल्याकडे जात असतांना आरोपी रफीक व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीस जुन्या बस स्टॅंडवर पोलीस स्टेशनच्या समोर अडवुन त्याचेवर हल्ला चढवुन डोक्यात लाकडी बॅट मारुन जखमी केले.
नौशाद उर्फ शाहनवाज खान हुसेन खान याच्या फिर्यादीवरुन आरोपी काळीपिवळीवाला रफिक नावाचा इसम व त्याचे अन्य दोन साथीदार यांच्यावर अप.नं.111/2019 कलम 324,506, 34 भादंवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व जखमीस पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले होते.
दरम्यान त्याच प्रकरणातील फिर्यादीचे समर्थक अकोला येथुन शस्त्र व गैरकायद्याची मंडळी घेऊन पातुर शहरात झालेल्या प्रकाराचा बदला घेण्याच्या व दहशत पसरविण्याच्या उद्देशाने येत आहेत अशी माहीती पातुर पोलीसांना भेटली असता शहरात येणारे सर्व रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान लाल रंगाची आर्टीगा गाडी क्र.एम.एच.30 टी.सी.143 थांबवली असता त्यामधील सात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडुन धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.त्यामधे आरोपी अफजल खान अहमद खान (25 वर्षे) रा.बैदपुरा अकोला,तनवीर खान अहमद खान (34 वर्षे) रा.बैदपुरा अकोला,मेहंदी हसन महबुब खान (34 वर्ष) रा.बैदपुरा अकोला,मजहर अहमद खान मोहम्मद खान (34 वर्ष ) रा.बैदपुरा अकोला, परवेझ अहमद खान हुसेन खान (36 वर्ष) रा.बैदपुरा अकोला, मोईन खान हसन खान (37 वर्ष ), रा.अकोला, अब्बास खान अजीज खान (55 वर्ष) यांच्या विरुद्ध अप.नं.112/2019 कलम 143,144,425 (आर्म ॲक्ट)भादंवि 37(1),135 मुंबई पोलीस अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार गुल्हाने साहेब यांच्या मार्गदर्शनात पातुर पोलीस करत आहेत.
अधिक वाचा : विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बाहकर यांची पहिली धडाकेबाज कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola