बाळापूर (प्रतिनिधी)– आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून बाळापूर पोलिसांनी अवैध दारू अड्ड्या वर लक्ष केंद्रित केले असून पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शना खाली दररोज अवैध देशी व हातभट्टी दारू विक्री अड्ड्यावर रेड करणे सुरू केले आहे, दिनांक 14।3।19 रोजी बाळापूर पोलिसांना खबर मिळाली की देगावं शिवारात गावठी हातभट्टी दारू काढणे सुरू आहे. पक्की खबर मिळताच पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शना खाली वाडेगाव चौकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव पाटील, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, हेड कॉन्स्टेबल राठोड, पवार, गावंडे ह्यांनी देगावं शिवारात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर रेड करून हातभट्टी दारू काढणारे मंगलसिंग देवचंद पवार रा देगावं ह्याला जागेवरच पकडून 15 लिटर हातभट्टी दारू व 10 डब्बे सडवा मोहमास असा एकूण 6500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. अवैध दारू विरूद्ध धाड सत्र सुरूच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सांगितले.
अधिक वाचा : प्रत्येक पोलीस स्टेशन गाजवणारे बाळापूरचे ठाणेदार गजानन शेळके यांनी एका तासात लावला सोन्याच्या चोरीचा तपास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola