तेल्हारा (प्रतिनिधी)- पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्याच्यापेक्षाही सरस कामगिरी करणाऱ्या अनेक महिला समाजात आहेत. असेच एक नाव म्हणजे सौ. विद्याताई निलेश म्हसाळ “कृष्णाई मल्टिसर्व्हिसेस” च्या त्या संचालिका आहेत. सोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया चे ग्राहक सेवा केंद्र सुद्धा त्या चालवितात. या केंद्राच्या माध्यमातुन महिलांमध्ये आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत जनजागृती घडविण्यासाठी त्या मनापासून प्रयत्न करतात. अटल पेन्शन योजना ,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,जनधन खाते उघडण्याचे बाबतीत,मनी ट्रान्सफर मार्गदर्शन त्या सामान्य महिलांना उपलब्ध करून देतात. तसेच स्टेट बँक चे ATM वाटप त्या करतात. बँकिंग सोबत वाहन विमा सेवाही त्या पुरवितात. वाहन विमा उतरविण्याचे कामही त्या सांभाळतात.
संयुक्त कुटुंबात राहून आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत संसाराला आर्थिक हातभार लावणाऱ्या विद्याताई महिलांसाठी एक प्रेरणास्थान आहेत. मेहनतीने घेतलेले शिक्षण,मिळवलेल्या पदव्या फाईल बंद करून न ठेवता त्याचा वापर आपल्या महिला भगिनींच्या विकासासाठी करणाऱ्या उच्चविद्याविभूषित विद्याताई म्हसाळ ह्या आपल्या परीने जिजाऊ-सवित्रीचा वारसा सांभाळत आहेत. इतर महिलांनी विद्याताई पासून प्रेरणा घेऊन आपल्या संसाराला हातभार लावण्या सोबतच आपले सामाजीक ऋण फेडण्यासाठी प्रवृत्त व्हावे. एक आदर्श पत्नी, आई, सून, मुलगी या सर्व भूमिकांत सहज वावरणाऱ्या विद्याताई खरोखरच “एक आदर्श स्त्री” म्हणून गौरवास्पद पात्र ठरतात. त्यांचे बहुआयामी कार्य पाहून असे म्हणावेसे वाटते.
अधिक वाचा : तळेगाव बाजार येथील प्रसिद्ध श्री सोमेश्वर महाराज यात्रा संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola