अकोला (प्रतिनिधी)- कुटुंब नियोजन योजनेंतर्गत मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील महिलेची शस्त्रक्रिया करण्यात आली; पण ही शस्त्रक्रिया त्या महिलेच्या जीवावर चांगलीच बेतली असून, सध्या या महिलेवर मुंबई स्थित जे.जे. इस्पितळात उपचार सुरू आहेत. या प्रकाराला प्राथमिक आरोग्य केंद्रावरील डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला.
प्राप्त माहितीनुसार, मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाथर्डी (ता. तेल्हारा) येथील रहिवासी मीना संतोष नावकार यांना कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रियेसाठी तयार करण्यात आले. त्यानुसार, २४ जानेवारी रोजी त्यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा दिवसांनी टाके काढण्यासाठी त्या पीएससीमध्ये गेल्या. त्यावेळी डॉक्टरांना त्यांच्या पोटावर सूज असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी ३० जानेवारी रोजी महिलेला तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी ड्रेसिंग काढताच पोटाची त्वचा निघाली. हे दृश्य पाहून डॉक्टरही थक्क झाले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार महिलेला खासगी रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने २१ फेब्रुवारी रोजी त्यांना मुंबईतील जे.जे. इस्पितळात दाखल करण्यात आले; पण त्या ठिकाणी महिलेच्या पोटावरील ड्रेसिंग उघडताच परिस्थिती आणखी चिंताजनक झाल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली.
अधिक वाचा : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील बोलणे पडले महागात,युवकाला सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola