भांबेरी-(योगेश नायकवाडे) संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त महावितरण वीज वितरण कंपनी भांबेरी च्या वतीने शेगावला पायदळ वारी करणाऱ्या भाविक भक्तांना जल वाटपसेवा,तथा बिस्कीट वाटप चे आयोजन पंचगव्हान जवळ शेत शिवारात शेगाव वारी मार्गावर आयोजित करण्यात आले होते, यात येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना भांबेरी महावितरण केंद्राच्या वतीने सेवा म्हणून पाणी, बिस्कीट वाटप करून दिवसभर वीज केंद्राच्या कर्मचारी वर्गाने उपस्थित राहून आपले योगदान दिले.यावेळी कनिष्ट अभियंता श्री पी टी जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ संजय माकोडे,वसंत दलनकर,तंत्रज्ञ गजाजन माळघणे, अफसर शाह,शरद वानखडे, प्रकाश कुचके, परमेश्वर इंजेपवाड, सै मकसूद अली, संदीप शेकोकार, योगेश खंडील, नागो आमझरे, सोपान कासुरकार सहित सर्व कर्मचारी उपस्तीत होते.