तेल्हारा(प्रतिनिधी)-श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त तेल्हारा येथिल युवक मंडळींनी तेल्हारा शहरातील सर्व शाळेमध्ये जाऊन माझी वारू स्वच्छ वारीचा संदेश दिला व तेल्हारा ते शेगाव रस्त्यावर दर एक किलोमीटर अंतरावर ओला व सुखा कचरा टाकण्याची पेट्यांची व्यवस्था करून स्वच्छतेचा संदेश दिला.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे विचार व कार्यशली जोपासून तेल्हारा येथील तरुण मंडळींनी तेल्हारा ते शेगाव मार्गावर स्वच्छतेचा संदेश म्हणून जागोजागी ओला व सुखा कचरा टाकण्याच्या पेट्यांची व्यवस्था करून पूर्ण परिसर स्वच्छ केला व सर्व पायदळ वारकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगून या उपक्रमात सहभागी करून घेतले कारण पायदळ वारकऱ्यांनसाठी रस्त्यानी महाप्रसाद नाश्ता व चहा पाण्याची व्यवस्था केलेली असते काही लोक महाप्रसाद उष्टा टाकून तो रस्त्याच्या कडेला टाकतात व काही दिवसांनी त्याचा वास सुटून रोगराई फैलु शकते त्या दृष्टीने आपल्या घराप्रमाणे आपला भारत देशही आपलं घरचं आहे या दृष्टिकोनातून श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाचे औचित्य साधुन या उपक्रमातुन रस्त्यावर कुठल्याही अन्नाची व इतर पदार्थांची नासाडी नाही झाली पाहिजे यासाठी तेल्हारा येथील अनुप मार्के विवेक खारोडे दिलीप पिवाल अजय पाटील गावंडे मंगेश घोंगे ऍड.जितेंद्र राठी श्रीकांत पाथ्रीकर विठ्ठल वाघोडे अनंत सोनमाळे गजानन गायकवाड ऍड संदिप देशमुख सुमित गंभीरे राहुल गडम राजकुमारजी शेंडे निखिल फोकमारे सतीश बोरकर व समस्त मित्रपरिवार तेल्हारा यांनी स्वछतेचा संकल्प राबवून स्वच्छतेचा व निरोगी आयुष्याचा संदेश दिला.