अकोट(मनीष वानखडे)– मागील वर्षा पासुन आकोट-अकोला राज्यमार्गाचे काम सुरू आहे अत्यंत दर्जाहीन काम सुरू आहे .संपुर्ण रस्ता खोदून ठेवल्या मुडे रस्त्यावर वाहन चालवणे कठीण झाले आहे तसेच रस्त्यावर धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर रोज पाणी मारणे अनिवार्य आहे परंतु अस होताना दिसत नाही संपूर्ण रस्त्यावर धूळ असल्या मुळे सोमोरील वाहन दिसत नाही त्या मुळे अपघातांची संख्या वाढली आहे व आरोग्याची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.याकडे प्रशासन तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अकोला जिल्हा युवक काँग्रेस ने अकोट -अकोला मार्गावरील देवरी फाटा येथे रविवारी नागरिकांना मोफत मास्क वाटले.तसेच जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध केला.
अनेक राजकीय पक्ष व संघटनांनी अकोट -अकोला राज्यमार्गावरील कामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.तसेच या समस्या कडे कोणीच लक्ष देत नसल्याने शासनाचा निषेध करण्यासाठी अकोट-अकोला मार्गावरील देवरी फाटा येथे नागरिकांना मोफत मास्क वाटप करून आगळे वेगळे आंदोलन जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निनाद मानकर व अकोला पूर्व विधानसभा अध्यक्ष अमोल काळणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले कार्यक्रमाला प्रामुख्याने एन.एस.यु.आय प्रदेश महासचिव आकाश कवडे,शहर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल सारवान,विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष अंकुश तायडे,अकोट विधानसभा उपाध्यक्ष प्रवीण बोडखे,जिल्हा युवक चे महासचिव महेंद्र पवार,विधानसभा सचिव अविनाश कोरफडे, अकोट सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सौरभ देशमुख,फरहान पटेल,अफजल शेख,राजू भोरे,शेख नासिर,अजय धांडे, रफिक खान,सययड सलीम,कार्तिक अबघड,विठ्ठल सदफळे,प्रदीप गावंडे,कृष्ण पवार,अभिजित तवर ,सोनू सारवान आदींच्या संख्येने युवक काँग्रेसचे सदस्य गण उपस्थित होते..