तेल्हारा(विशाल नांदोकार)-तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथील मारोती मात्रे यांच्या शेतातील झोपडीला आग लागून प्रथम अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.तेल्हारा तालुक्यातील शेतकरी मारोती मात्रे व शेतात महिला मजूर काम करीत असतांना अचानक झोपडीजवडील इलेक्ट्रिकच्या खांबावर शॉटसर्किट झाल्यामुळे झोपडीला आज दि 24 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजेच्यादरम्यान अचानक आग लागल्यामुळे झोपडीत असलेले जनावरा करिता ठेवलेले कुटार, स्पिंकलर सट, रोटा रेटर, बोअर वेलचे पाइप, थिबकचे पाइप, तसेच शेतीचे अवजरे असे ऐकून अंदाजे एक लाख रूपयाचे नुकसान झाले असून मारोती मात्रे है आधीच आर्थिक संकटात असल्यामुळे आज लगलेल्या आगिमुळे जनु त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. तरी त्यांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मात्रे यांनी मागणी केली आहे.