बाळापूर (शाम बहुरूपे) : महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट द्वारा संचालित नॅशनल मिल्ट्री स्कुल अंड कॉलेज ऑफ सायन्स अकोला गायगाव येथे शिवजयंती व रविदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक विजय हाडोळे प्रमुख अतिथी म्हणून जनसंपर्क अधिकारी किशोर पवार, किशोर इंगळे, प्रशांत खेरडे यांची उपस्थिती होती. तर विशेष मार्गदर्शक म्हणून बार्टीच्या कु. प्रज्ञा प्रभाकर खंडारे ह्या होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. लोक व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. आशुतोष डाबेराव ह्या विद्यार्थ्यांने शिवाजी महाराजांना बद्दल आपले विचार प्रगट केले. तसेच उदयराज गावंडे यांनी संत रविदास यांच्या विषयी आपले विचार उपस्थितांसमोर मांडले. श्रेयस तारडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सुंदर पोवाडा सादर करून शिवच्रिरित्र मांडण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रशांत खेरडे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनाचे विविध पैलू मांडले. तर पर्यवेक्षक विनय हाडोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच किशोर पवार व किशोर इंगळे यांनी देखील आपले विचार प्रगट केले. विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे) समतादूत कु. प्रज्ञा खंडारे यांनी शिवाजी महाराज व त्यांचे समता दृष्टि स्वराज्य या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून समतेचे विचार मांडण्याचा प्रयत्न केला. समाजातील जातीभेद नष्ट करून परधर्मी यांचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खरोखरच आपले कुलदैवत आहेत व त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण चालायचे आहे अशाही त्या म्हनाल्या.
महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरेचा समृद्ध इतिहास आज आपण वाचायला हवा म्हणून बार्टी मार्फत विविध जाती धर्मावरील विचारवंतांचे पुस्तक ही नॅशनल मिलिटरी स्कूलच्या ग्रंथालयाला भेट देण्यात आली. या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्वप्नील सरदार तर आभार विशाल सुरडकर यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुमेध वाणरे, वाहूक पुरढे, प्रफुल्ल वरोकार, विवेक वासनकर सांस्कृतिक विभाग व वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
अधिक वाचा : तेल्हारा येथे शिवजयंतीच्या पर्वावर भव्य मोटार सायकल रॅली संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola