हिवरखेड (प्रतिनिधी) : लोकजागर मंच हिवरखेड नेहमीच काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असते याचेच उदाहरण म्हणजे लोकजागर मंचने 19 फेब्रुवारीला शिवजयंती कार्लावेस स्मशानभूमीत साजरी केली यावेळी शिवाजी महाराज व संत रविदास महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन 115 वृक्षांना रंगरंगोटी करण्यात आली त्यामुळे स्मशानभूमीत प्रसन्न वातावरण निर्माण झाले त्यानंतर लोकजागर मंच कार्यालयात नाभिक समाज बांधवांना शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले यावेळी शिवरायांचे स्वराज्य स्थापन करण्यात नाभिक समाजाचे योगदान व जिवाजी महाले यांचा पराक्रम लोकजागर मंच हिवरखेडचे अध्यक्ष महेंद्र कराळे यांनी समजावून सांगितले यावेळी लोकजागर मंचचे कार्याध्यक्ष सुरेश ओंकारे,पंकज देशमुख,संतोष गावंडे,प्रशांत भोपळे, अभिजित ढोकणे, प्रवीण गावंडे,रमेश व्यवहारे,लक्ष्मण धांडे, राजेश टाले,वैभव गावंडे यांच्यासह सर्व सदस्य हजर होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन संघटक निखिल भड यांनी केले.
अधिक वाचा : शिवजयंती साधेपणाने करून जय बजरंग प्रतिष्टान ने केले रुग्णांना फळ वाटप
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola