बेंगळुरु : कर्नाटकातील बेंगळुरु येथील एअर शोपूर्वी मंगळवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. एअर शोसाठी सराव करत असताना दोन सूर्यकिरण विमानांमध्ये टक्कर झाली. यालहंका एअरबेसवर ही दुर्घटना घडली .
यालहंका एअरबेसवर बुधवारपासून एअर शोला सुरुवात होणार आहे. या एअर शोमध्ये विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरती पाहायला मिळतील. यापार्श्वभूमीवर मंगळवारी विमानांचा सराव सुरु होता. सरावासाठी उड्डाण घेत असताना दोन सूर्यकिरण विमानांची टक्कर झाली. यानंतर दोन्ही विमान एअरबेसच्या आवारातच कोसळली. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला.
बेंगळुरु पोलिसांनी या दुर्घटनेबाबत माहिती दिली आहे. ‘एअर शोच्या पार्श्वभूमीवर सराव करत असताना ही दुर्घटना घडली. दोन्ही वैमानिक सुरक्षित असले तरी या दुर्घटनेत एक नागरिक जखमी झाला आहे’, असे पोलिसांनी सांगितले.
सूर्यकिरण ही भारतीय हवाई दलातील एक तुकडी असून या विमानांचा वापर हवाई कसरतींसाठी केला जातो. १९९६ ते २०११ दरम्यान या विमानांचा वापर केला गेला. यानंतर २०१५ मध्ये या विमानांमध्ये दुरुस्ती करुन त्यांचा पुन्हा वापर सुरु झाला. या ताफ्यात सध्या नऊ विमाने आहेत.
अधिक वाचा : पुलवामात पुन्हा हल्ला; मेजरसह चार जवान शहीद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola