अकोला (प्रतिनिधी): सामाजिक संस्थानच्या कार्यामध्ये वृत्तपत्र, पत्रकार, माध्यमांची भूमिका अत्यंत मोलाची आहे असे प्रतिपादन अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतअली मिरसाहेब यांनी केले. रोटरी क्लब अकोला ने आय एम ए हॉल मध्ये आयोजित केलेल्या 33 व्या सभेत ” सामाजिक संस्थांच्या कार्यात पत्रकार, माध्यमांची भूमिका ” या विषयावर प्रमुख अतिथी म्हणून मिरसाहेब बोलत होते.
मिरसाहेब यांनी पुढे बोलताना रोटरी क्लब ने देशात पोलिओ निर्मूलनाचे कार्यात फार मोठे काम केले असल्याचे सांगून यामध्ये वृत्तपत्रांनी रोटरी क्लब ला दिलेल्या सहकार्यामुळेच पोलिओ निर्मूलनाचे काम शक्य झाले असल्याचे आवर्जून सांगितले , रोटरी क्लब चे दिव्यांगा करीता जयपूर फूट वितरण , अवयवदान , रक्तदान , नेत्रदान शिबिरांचे उपक्रमामुळे गरजू लोकांना त्याचा लाभ झाला आहे , आरोग्य सेवे च्या क्षेत्रात रोटरी क्लब करीत असलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे मिरसाहेब यांनी सांगितले.
सामाजिक संस्थांनी जनहिताच्या कामात पत्रकार , माध्यमांना सहभागी करून घेतल्यास ते जनतेसाठी अधिक फायद्याचे ठरेल असे त्यांनी सांगितले , समाजाला भेडसावत असलेल्या भ्रूण हत्त्या , बेटी बचाव , बेटी पढाव , पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड , पाणी , विजेची बचत , भोगवादी संस्कृती कडे लोकांचा वाढता कल या ज्वलंत समस्यांवर ही रोटरी क्लब सारख्या सामाजिक संस्थानी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज असल्याचे मिरसाहेब यांनी सांगितले.
या सभेत रक्तदानाची गरज व थैलसिमीयाग्रस्त रुगणांच्या मदतीसाठी मानवतेच्या दृष्टीने पुढे यावे अशी विनंती रक्तदाना च्या क्षेत्रात सक्रीयतेने कार्य करणारे पत्रकार निलेश जोशी यांनी या सभेत बोलताना केली , डॉ हेडगेवार रक्तपेढी द्वारे सुरू असलेल्या सेवकार्याची निलेश जोशी यांनी माहिती दिली
रोटरी क्लब चे अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे यांनी यावेळी त्यांच्या मातोश्री च्या जन्मदिनाप्रसंगी एका थैलसिमीया ग्रस्त रुग्णाला रक्त पुरवठ्यासाठी पालकत्व घेण्याची घोषणा या सभेत केली.यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष समाज सेवी ब्रिजमोहन चितलांगे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते तर प्रकल्प प्रमुख विजय जानी मंचावर उपस्थित होते. यावेळी रो.अशोक पंड्या यांनी प्रास्ताविक केले , रो रमण राठी, प्रदीप जैन यांनी अतिथींचे स्वागत केले ,रोटरी क्लब तर्फे आयोजित केलेल्या मॅमोग्राफी कॅम्प ची माहिती विजय जानी यांनी दिली,डॉ वाघेला, प्रमोद जैन , मोकाशी , विशाल राजे बोरे , मो निसार शेख , कमलकिशोर शर्मा ,प्रा राठी व रोटरीयन्स सभेला उपस्थित होते आभार प्रदर्शनं रोटरीयन मनोहर विरवाणी यांनी केले
अधिक वाचा : ९ व १० फेब्रुवारी रोजी नागपुरात म.रा.वि.मं. अधिकारी संघटनेचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola