अकोला (प्रतिनिधी)-अंधश्रद्धानिर्मूलन,व्यसनमुक्ति,स्वछता कार्य आदि महानकार्य आपल्या जीवनभर करून समाजाला डोळसरित्या जगण्याचा मूलमंत्र देण्याचे काम१अस्वे करणारे राष्ट्रसंत श्री.गाडगेबाबा यांना भारतरत्न जाहिर व्हावा अशी एकमुखी मागणी महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ आणि श्रीक्षेत्र ऋणमोचन स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली.
गाडगेबाबा हे केवळ कोण्या एका समाजाचे म्हणून त्यांच्या महान व्यक्तिमत्वाकडे शासनाने न पाहता महाराष्ट्र व भारतभर त्यांनी केलेल्या मानवतावादी कार्याकडे पाहावे व बाबांना भारतरत्न जाहिर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शिफारस पाठवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) सेवा मंडळ आणि संत गाडगेबाबा स्मारक समिती श्रीक्षेत्र ऋणमोचन (जि.अमरावती) येथे आज रविवार,३ फेब्रूवारी रोजी सालाबादप्रमाणे वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी धोबी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.बालजीराव शिंदे हे होते.आ.रवी राणा यांची विशेष उपस्थिती होती.महोत्सवात राष्ट्रीय समाज प्रबोधनकार सप्तखंजीरीवादक
सत्यपाल महाराज यांचे गाडगेबाबा यांच्या शिकवणीवर आधारीत कीर्तन झाले.
राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी यांनी मनोगतात समाजाची वाटचाल व शासनाकडे प्रलंबित आरक्षण,राष्ट्रीय स्मारकाच्या निधिबाबतच्या मागण्यांच्या उहापोह केला. कु.मोनिका काळे व कु.शर्वरी प्रशांत चाहकर यांनी सुद्धा धारदार शैलीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली.
*शासनाला अल्टीमेटम-*
धोबी समाजाच्या पूर्ववत आरक्षणाची शिफारस राज्य सरकारने आचारसंहितेपुर्वी न पाठविल्यास राज्यभर छोट्या-छोट्या समाजाला सोबत घेऊन वणवा पेटवण्यात येईल,असा ईशारा देत यासाठी २५ फेब्रुवारी पर्यंतचा अल्टीमेटम सत्ताधारी शासनाला राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे यांनी आपल्या भाषणातून दिला.
व्यासपीठावर मा.प्रदेशाध्यक्ष विजयराव देसाई,राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेंद्र पवार, राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्रशेठ सोनवणे,नाशिकचे उद्योजक राजेंद्रशेठ आहेर,आरक्षण हक्क परिषदेचे प्रदेश कार्यवाहक विवेक ठाकरे,महिला प्रदेशाध्यक्ष सौ.प्रतिभाताई गवळी,विदर्भ विभाग अध्यक्ष विजयराव गोरडवार, नागपुर शहराध्यक्ष मनिष वानखेड़े, जळगाव जिल्हाध्यक्ष कैलास शेलोडे, डेबूजी फोर्स प्रदेशाध्यक्ष कैलासराव तेलंग,नांदेड़ जिल्हाध्यक्ष गंगाधर माहुले,संभाजी चंचलवार यांच्यासह स्मारक समितीचे रा.ह.चांदूरकर, मनोहरराव चव्हाण,श्रीकृष्ण उंबरकर, गोपी अण्णा चाकर, बालजीराव इबीटवार, सौ.कमलताई पालकर, सुभाषराव शिंदे, ऋणमोचनच्या सरपंच हर्षाताई चौधरकर, संभाजी ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पंकज जायले,आनंद सुगळीकर, कुलदीप तराडे आदिंची उपस्थिति होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकोला जिल्हाध्यक्ष बाळसाहेब मोकाळकर यांनी केले.प्रास्ताविक विश्वस्त प्रमोद चांदूरकर यांनी केले.आभार प्रदेश मुख्य संघटक संजय भिलकर यांनी मानले.भगवान किल्लेकर,डॉ.उल्हास मोकळकर,
प्रशांत चाहकर, कृष्णदास चांदूरकर,रमेश मोकळकर,साईनाथ हजारे,माधव बोरसे, श्रीकृष्ण कंसकार,मुकेश डाहेकर,दिनेश जुऊळकर,रुपेश चाहकर,गणेश मोकळकर,जगदीश चाकर,संतोष बोरकर,गोपाल कंडारकर,गणेश डहाके, रमेश अमृतकर,प्रशांत मानकर,चेतन मानकर,अजय चाहकर,शरद ठाकरे, निशांत द्रोणकार आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले. अमरावती, अकोला, बुलढाणा,नांदेड,वर्धा,जळगाव,नाशिक,
नागपूरसह राज्यभरातील ठिकठिकाणचे हजारो समाजबांधवांनी ऋणमोचन येथे उपस्थिती देत महोत्सवात सहभाग नोंदविला.