अकोला(प्रतिनिधी) – वगत दोन ते अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या महावितरणच्याअकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भांडूप परिमंडळांतर्गत येणाऱ्या ठाणे शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या डोये यांना पदोन्नती देऊन अकोला परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी नियुक्ती देण्याचा आदेश महावितरणच्या मुख्यालय असलेल्या प्रकाशगड येथून ३१ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला.
अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी महावितरणला १९ नोव्हेंबर २०१८ रोजी सोडचिठ्ठी देऊन त्रिपुरा महावितरण कंपनीचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून मुख्य अभियंता पदाचा भार अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्याकडे होता. महावितरण मुख्यालयातून ३१ जानेवारी रोजी पाच अधीक्षक अभियंत्यांना बढती देऊन त्यांची नियुक्ती मुख्य अभियंतापदी करण्यात आली. यामध्ये ठाणे शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अनिल डोये यांना अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. अनिल डोये यांनी यापूर्वी अकोला येथे महावितरणमध्ये पायाभूत आराखडा (इन्फ्रा)चे अधीक्षक अभियंता म्हणून काम पाहिले आहे. लवकरच ते मुख्य अभियंता पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती आहे.
अधिक वाचा : थकित वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांवर ग्राहकाचा हल्ला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola