मुर्तिजापूर (प्रतिनिधी) : अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमारेषेपासून ५० फूट अंतरावर कुरुम पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या करूम रेल्वे स्टेशन जवळील दाढी मोरी जवळ एक मोटार सायकल घसरल्याने मोटरसायकलवरील पतीसोबत आधार कार्ड बनवण्याकरता जात असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज ३१ जानेवारी रोजी दुपारी १.२० वाजेच्या दरम्यान घडली.
अमरावती जिल्ह्यातील फुलआमला येथील अनंता तुकाराम मुंढे वय २५ हे पत्नी सौ. दुर्गा आणि पाच महिन्याचा मुलगा यांच्यासह मोटरसायकल क्रमांक एम एच २७-बी.एच.७११२ ने कुरुम येथे आधार कार्ड बनवण्याकरिता जात होते. त्यांना बाळंतपणाचे पैसे खात्यात जमा होणार असल्याने आधारकार्ड बनवायचे होते. घरापासून एक किलोमीटर अंतरावर आल्यानंतर अमरावती जिल्हा संपल्यानंतर पुढे ५० फुट अंतरावर कुरुम रेल्वे स्टेशन जवळील दाढी-पेढी रेल्वे मोरी जवळ त्यांची मोटरसायकल घसरली. त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. तसेच पती आणि मुलगाही १५ मिनिटे रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते.
काही वेळानंतर आलेल्या टाटा एस गाडीच्या चालकाने त्यांना कुरुम ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पत्नीची तब्बेत गंभीर असल्याने तिला इर्विन शासकीय रुग्णालय अमरावती येथे नेण्यात आले. परंतु रस्त्यातच तिचा मु्त्यु झाला. दोन वर्षापूर्वी दुर्गासोबत अनंताचे लग्न झाले होते. गावांमध्ये मोलमजुरी करून ते आपले कुटुंब चालवत होते.
अधिक वाचा : दोन महिन्याचे बाळ आईनेच पाठविले यमसदनी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola