पातूर (सुनिल गाडगे)- महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. या संत परंपरेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पुरोगामी विचारधारेला जोपासले आहे. महात्मा ज्योतीराव फुले यांनी कर्मकांड बाजूला सारुन मानवतेचा संदेश दिला. तीच शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिली. आता हा विचार राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज संपूर्ण देशात करीत आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तायडे यांनी केले.
महाराष्ट्र माळी युवक संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर, दिनदर्शिका विमोचन व सत्यपाल महाराज यांच्या राष्ट्रीय किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्रकाश तायडे बोलत होते. पुरोगामी चळवळीचे विचार रुजविण्याचे काम, समाज संघटित करण्याचे काम महाराष्ट्र माळी युवक संघटना करीत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाला नगर परिषदेचे गटनेते सैय्यद बुरहान, न. प. सदस्य सैय्यद मुजाहिद इकबाल सैय्यद मोहसिन, कार्यक्रमाचे आयोजक गजानन बारतासे, न. प.उपाध्यक्ष राजू उगले, आरोग्य सभापति वर्षाताई बगाडे, नगर सेविका तुळसाबाई गाडगे, माजी नगराध्यक्षा मिराताई तायडे, महावितरणचे उपविभागिय अभियंता संतोष खुमकर, जयसिंह डी. जाधव, डॉ. टि. एम. ढोणे, सेवा समितिचे अध्यक्ष रामेश्वर बरगट, सचिव अॅड. संतोष भोरे, ज्ञानेश्वर साकरकर, श्रीपाद खेळकर, गोपाल गाडगे, सचिन धनोकार, दिलिप निमकंडे, सुनिल गाडगे, निर्भय पोहरे, कैलास बगाडे, प्रविण इंगळे, संगीताताई इंगळे, महेंद्र गवई, विजय हिरळकार, तिमांडे महाराज, दिपक बोचरे, मुक्तार सर, परशराम बंड, योगेश इंगळे, शैलेश बोचरे, मुख्य संयोजक चंदुभाऊ बारतासे, शोभाताई बारतासे ह्या प्रामुख्याने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र माळी युवक संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. दरम्यान स्वरा गाडगे, शरयु उगले व शिव हिरळकार या बाल कलाकारांनी सावित्री-जिजाऊ एकपात्री नाटक सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. संचालन चंदुभाऊ बारतासे यांनी केले. तर आभार सचिन धनोकार यांनी मानले. यानंतर सत्यपाल महाराज यांच्या राष्ट्रीय किर्तनाला सुरुवात झाली. सत्यपाल महाराजांनी आपल्या अनोख्या शैलीतून समाजातील वाईट रुढी-परंपरेवर वार केले. विनोदातून प्रबोधन करीत श्रोत्यांना रिजवले. सत्यपाल महाराज यांच्या किर्तनाला झालेल्या गर्दिने आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडले. हे विशेषतः महाराजांच्या किर्तनासाठी जिल्हाभरातुन नागरिकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सागर कढोणे, अमोल गाडगे, सुनिल पाटिल, सचिन गिर्हे, नितिन बारतासे, सुरज निलखन, सागर माहुलीकर, योगेश फुलारी, शंकर पाटिल, लखन ढगे, राज बोचरे, हर्षल खोकले, गजानन फुलारी, विकी पाटिल, राहुल सावत, संतोष बंड, नयन ढोकणे, शिवाजी राऊत, नटवर खुर्दे, राम उगले, रोशन वानखडे, सुमित बारतासे, बंटी उगले, महेश सौंदळे, योगेश क्षीरसागर, प्रथमेश निमकंडे आदींनी परिश्रम घेतले.
अधिक वाचा : कृतीशुन्य भाजपाला केंद्र व राज्यातुन उखडून फेका : डॉ.सुभाषचंद्र कोरपे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola