अकोला (प्रतिनिधी) : केंद्र व राज्यात सत्ता मिळविणेसाठी भाजपाने निवडणूकीचे वेळी जनतेला भरघोष आश्वासने देऊन एकप्रकारे भुल पाडली. सत्ता मिळालेवर मात्र दिलेली आश्वासने बाजूला सारुन जनहिताची कोणतीच कृती केलेली नसल्याने कृतीशुन्य भाजपा सरकारला केंद्र व राज्यातून उखडून फेका असे प्रतिपादन अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष डॉ.सुभाषचंद्र कोरपे यांनी केले. तालुका काँग्रेस कमिटीने गांवागांवीच्या घरोघरी सुरु केलेल्या जनसंपर्क अभियानात गोरेगांव बु. येथील नागरीकांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.
या सभेस गोरेगांव बु. येथील प्रामुख्याने सर्वश्री विजयराव भाकरे, प्रविण बंड, तेजराव भाकरे, नामदेव वौतकार, रामदास प्रधान, अशोक भाकरे, उल्हास भाकरे, शरद ढोरे, भाष्करराव भाकरे, मंगेश भाकरे, प्रशांत भाकरे, शौलेश भाकरे, पुरुषोत्तम धनोकार, संजय ढोरे, गुलाबराव पवार, गजानन भाकरे, संतोष वाघ, अनंत भाकरे, उमेश शेगोकार, महादेव भाकरे, वसंत पवार, राजकुमार भाकरे, ज्ञानेश्वर राऊत, विजय पवार बाजीराव ढोरे, अरुण ढोरे, संतोष ल.ढोरे, विठठलराव भाकरे, ज्ञानेश्वर भाकरे, उध्दव भाकरे, रमेश भाकरे, आकाश भाकरे, चेतन भाकरे, प्रशंात ढोरे, चंद्रशेखर ढोरे, राजेश ढोरे, रामदास काकड, नरहर हांडे, आर.टी.गावंडे, श्रीराम ढोबरे यांचेसह गांवातील नागरीकांची मोठी उपस्थिती होती. भाजपा सरकारने अनावश्यक ठिकाणी बंधारे बांधले, पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविली नाही. प्रमुख गरज असूनही गांव तलाव आणि शेतरस्त्यावर भरावा टाकणेचे काम केले नाही, रोजगार हमी योजनेची योग्य अंमलबजावणी केली नाही. तुरीच्या पिकाचा उत्पादन खर्च जास्त असतांना या पिकाच्या हमीभावाकडे दुर्लक्ष करीत कमी भाव जाहीर केला. अशा तक्रारी नागरीकांनी मांडून भाजपाला दुर सारणेचा निर्धार व्यक्त केला.
अकोला येथील कोरपे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मधील जनसंपर्क कार्यालयातून सुरु झालेल्या अभियानात डॉ.कोरपे यांच्या समवेत काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते हेमंत देशमुख , रमेशमामा म्हैसने, जयंत इंगोले, प्रफुल्ल गुप्ते, गुलाबराव थोरात, बाबुराव इंगळे, गजानन डेहणकर, अजाबराव टाले यांनी जनसंपर्क अभियानात सक्रिय सहभाग घेऊन घरोघरी काँग्रेसची ध्येय धोरणे समजाऊन सांगीतली. कार्यक्रमाचे संचालन हेमंत देशमुख तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष जयंत इंगोले यांनी केले.
अधिक वाचा : विश्वास घातकी भाजपा सरकारला धडा शिकविणे काळाची गरज – डॉ.सुभाषचंद्र कोरपे