पातूर (निलेश किरतकार) : शहरात ‘तुबा एज्युकेशन सोसायटी’ व ‘खिदमत फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पातूर नगर परिषदच्या मौलाना अबुल कलाम आझाद सांस्कृतिक सभागृहात दिव्य कुराण परिचय आणि आधुनिक विज्ञान प्रदर्शणीचे आयोजन दोन दिवस सोमवार आणि मंगळवारी करण्यात आले होते.
या प्रदर्शणीचे उद्घाटन पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विजय महल्ले, सुप्रसिद्ध हाडांचे डॉ. रहेमान खान, सिन्हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एन.जायले, शंकरराव बोचरे, जयसिंग जाधव, भीमराव कोथळकर, शंकरराव नाभरे, सचिन ढोणे, पत्रकार देवानंद गहिले, बाळूभाऊ बगाडे, रामराव तिमांडे महाराज, पत्रकार छोटुभाऊ काळपांडे, डॉ. वसीम, एॅड. संतोष मानमोडे, एॅड. अमजद अली काझी, एॅड. सौ.भारतीताई देशमुख, पातूर न.प.माजी अध्यक्ष हिदायत खान आदी मान्यवर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मुफ्ती रोशन कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात ‘तीलावते कुराण’ च्या पठणाने करण्यात आली . त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे दोन्हीं संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पातूरचे तहसीलदार डॉ. रामेश्वर पुरी, पोलीस उपनिरीक्षक विजय महल्ले यांनी मनोगत व्यक्त केले आणि या कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाला माजी न.प.अध्यक्ष मुस्ताकंमनशां, फरहान अमिन, मेहताब पहेलवान, ताज अतहर, प्रा.सि.पि. शेकूवाले, दुलेखान युसूफ खान,अब्दुल कुददुस, दैनिक सुफाचे संपादक सज्जाद हुसेन, राहिलभाई, धीरज देशमुख, अल्हाज युनुस सर,एॅड. मोहसीन, ऍड,शोएब,हयात जमादार ,सलीम ठेकेदार, एजाज मेंबर,जमाते इस्लामी चे अब्दुल कादिर, सै, मुंतजीमोद्दीन,करीम सर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नातीक शेख यांनी केले. तर आभार डॉ.वकार अन्सारी यांनी व्यक्त केले.
अधिक वाचा : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद ,सात दिवसात पोर्टलवर 724 शेतकऱ्यांचे अर्ज
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola