मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलचा लाभ घेत मागील सात दिवसात राज्यातील सुमारे 724 शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत.
ऊर्जामंत्री ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते नुकतेच सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे झाले आहे. तसेच या पोर्टलवर शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यस्थिती बघणे आणि शेतकऱ्यांकडून नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती, याशिवाय मराठी व इंग्रजी या भाषेतील ऑडिओ-व्हीडीओ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच या पोर्टलवर योजनेअंतर्गत सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्या कंत्राटदाराकडून सौर कृषीपंप बसवून घेता येईल. या पोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
अधिक वाचा : जाळपोळीच्या विरोधातील सोमठाण्याचे ५० आदिवासी स्वतःहून गेले जंगलाबाहेर,चिथावणीखोरांवर येणार संक्रांत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola