अकोला (प्रतिनिधी) – अकोट वन्य जीव विभागाच्या अति संरक्षित क्षेत्रा मध्ये अवैधरीत्या घुसून जाळपोळ करणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई आरंभली आहे. २० लोकांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुनर्वसित गावकऱ्यांपैकी काही गावकरी वन व वन संपत्ती तसेच अधिकारी यांच्या गाड्यांना हानी पोहोचवणे आम्हाला मान्य नाही. कायदेशीरपणे मागण्या मान्य करून घेऊ असा पवित्रा घेत सोमठाणा येथील ५० गावकरी प्रतिबंधित वनक्षेत्राबाहेर गेले आहेत.
रविवारी सकाळ पासूनच अमरावती व अकोला येथील जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पुनर्वसन अधिकारी, अकोट वन्य जीव विभागाचे डीएफओ, धारणीचे एसडीओ आदिवासींना समजावून सांगण्यासाठी गेले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश येण्याची चिन्ह आहेत. प्रशासन आता सामंजस्य व बळाचा वापर या दोन्ही प्रकाराने ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अकोट वन्यजीव विभागाच्या कार्य क्षेत्रातून पुनर्वसित करण्यात आलेले गावकरी गेल्या सोमवार, १५ जानेवारी रोजी अवैधपणे वन्यजीव क्षेत्राच्या गाभा क्षेत्रात घुसले. या आदिवासींनी जंगलातील संपत्तीला हानी पोहोचवणे सुरू केले. वनाला आगी लावणे, पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर हल्ला करणे आदी प्रकार केलेत. त्यामुळे काल मोठा पोलिस ताफा त्या ठिकाणी पाठवण्यात आला होता.
अकोल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी लोणकर, अमरावती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, अकोला अतिरिक्त पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख, अमरावती एसपी झळके, धारणी एसडीओ राहुल कर्डीले, अमरावती पुनर्वसन अधिकारी अजय लहाने, अकोला सीईओ पगारे, अकोट वन्यजीव विभागाच्या बेऊला एजील मठी, एमटीआरचे डीसीएफ विशाल माळी यांच्यासह महसूल व वन खात्याचे अधिकारी घटनास्थळी गेले. त्यांनी पुनर्वसित गावकऱ्यांना सर्व समजावून सांगितले. त्यांच्या न्याय मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले. पुनर्वसनमधील त्रुटी दूर करून समस्येचे समाधान करण्यात येईल असे सांगितले.
अधिकारी वर्गाच्या या पुढाकाराने काही आदिवासींनी अस्वस्थ झालेत वन संपत्तीला हनी पोहोचवणे हे आमच्या संस्कृतीमध्ये नाही असा पवित्रा घेत सोमठाणा येथील ५० गावकरी स्वतःहून जंगला बाहेर निघून गेल्याची माहिती आहे.
शेत जमीन मागणीचा तिढा आदिवासी प्रत्येक सज्ञान व्यक्तीला ५ एकराची शेत जमीन मागत आहे.शासनाच्या प्रचलित नियमानुसार प्रत्येक सज्ञान व्यक्तीला एक एकर शेत जमीन देण्यात येते.सध्या अकोला जिल्ह्यात वाटण्या योग्य ११५ एकर शेत जमीन आहे.आदिवासींनी या गैर कायदेशीर मागणीचा आग्रह सोडावा कायद्यानुसार त्यांना आताच शेत जमीन देण्याचे दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे.
पाठीराख्यावर वरवंटा फिरणार : भोळ्याभाबड्या आदिवासींना चिथावून त्यांना कायद्याचा भंग करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांच्या विरोधात प्रचलित कायद्यानुसार गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत.वन विभाग जवळ अशा व्यक्तीच्या विरोधात पुरावे असून भादंवि तसेच वन कायदा या मधील कलमा शिवाय राजद्रोहा सारखे गंभीर गुन्हे देखील नोंदवण्यात येणार आहे. अटकेतील आदिवासींना चिथावणी देणाऱ्या,मार्गदर्शन करणाऱ्या व रसद पुरवण्याची नावे सांगितले या तथाकथित प्रतिब्ठीताच्या व राजकीय नेत्याच्या हातात बेड्या ठोकण्यात येण्याची तयारी सुरू झाल्याचे सांगण्यात येते.
अधिक वाचा : अकोल्यातील शाळा महाविद्यालय परिसरात चिडीमारांचा बोलबाला, विद्यार्थीनी मध्ये भीतीचे वातावरण
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola