तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्यातील चांगलवाडी येथील अल्पवयीन मुलीला माळेगाव बाजार येथील दोन युवक हे नेहमीच चिडीमारी करून त्रास देत होते. त्यावरून सदर मुलीने त्रास देणाऱ्या युवकाविरुद्ध तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आज आरोपींनि अकोट येथील सेशन कोर्टात जमानत मिळवण्यासाठी याचिका दाखल केली होती. ती आज कोर्टाने नामंजूर केल्याने या चिडीमार युवकांना चांगलाच चाप बसला.
तालुक्यातील चांगलवाडी येथील एक अल्पवयीन विद्यार्थिनी माळेगाव बाजार येथे शिक्षणा करीता येत होती. माळेगाव बाजार येथील आरोपी नामे आशिफ शाह अहेमद शाह(२३), शे.अश्पाक उर्फ इस्माईल शे.युनुस (१९) हे सदर युवतीला नेहमीच त्रास देत असत दि. ६ डिसेंबर २०१८ रोजी आरोपींनि सदर मुलगी शाळेत जात असताना गाडीने पाठलाग करणे तसेच ऑटो त्यांच्या आडवा करून त्याना अडवून अश्लील हातवारे करून तुझा घरच्यांना काही सांगितले तर जीवे मारून टाकू अशी धमकी दिली होती. त्यावरून सदर मुलीने तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आज विद्यमान अकोट सेशन कोर्टात आरोपींनि जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये एस. ए. श्रीखंडे यांच्या विद्यमान कोर्टाने त्यांचा जामीन नाकारला. यावेळी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी भक्कम अशी बाजू मांडून आरोपींचा जामीन नामंजूर करून घेतला. या निकालाने मात्र चिडीमारांचे धाबे दणाणले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola