दहीहंडा(शब्बीर खान)- लहान मुलांच्या वादातुन दहिहांडा येथे दोन गटान तुफान हाणामारी झाल्याची घटना 19 जानेवारी रोजी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली. या हाणामारीत तिघे जण गंभिर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे . घटनेची माहिती मिळताच दहिहांडा पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रण आली. तसेच दहिहांडा गावात दंगा काबू पथक तैनात करण्यात आले असुन रात्री उशिरा अतिरीक्त पोलिस अधिक्षका सह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. घटना अशी आहे की दहिहांडा येथे शनिवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान दोन मुला मध्ये आठवडी बाजारात वाद सुरु होता.
हा वाद मिटविण्यासाठी दहिहांडा गावातील रहेवासी गजानन वानखडे यांनी पुढाकार घेतला या वादाचे पऱ्यवसान हाणामारी झाले. त्या नंतर दहिहांडा येथुन तिन किलो मिटर अंतरावर हिंगणी बु गावातील येथील 25 ते 30 जण दहिहांडा येथे आले तसेच दहिहांडा गालवतील युवकांनी त्यांना प्रतिउत्तर दिल्याने दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.या हाणामारीत तिघे जण जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच दहिहांडा पोलिस स्टेशन चे ठानेदार प्रदिप देशमुख यांंनी घटना स्थळावर धाव घेऊन दोन्ही गटातील परिस्थिती वर नियंत्रण मिळवीले . तिन्ही जखमिंना तातडीने अकोला येथील सर्वोपचार रुग्णाल्यात पाठवण्यात आले. तसेच गावात दोन दंगा पथका सह अतिरीक्त पोलिस बंदोबस्त लावण्यात आले होते. त्यामुळे गावात तवावपुप्ण शांतता कायम राखण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अतिरीक्त पोलिस अधिक्षक विक्रांत देशमुख , अकोट शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल सोनोने , अकोट ग्रामिण पोलिस स्टेशन चे ठानेदार मिलींदबहाकार तसेच अकोट फैल पोलिस स्टेशन चे ठानेदार भारसाकळे यांनी घटना स्थळी भेट दिली .
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola