अकोला (प्रतिनिधी) : बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप सोबतच अस्थमा व दम्याच्या आजारामुळे अकोलेकर त्रस्त आहेत. परिणामी दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले असून, नागरिकांनी योग्य उपाय योजना करून आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
थंडीसोबतच शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. त्याचा थेट परिणाम अकोलेकरांच्या आरोग्यावर होत असून, फुफ्फुस व स्वसनाशी निगडित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. शिवाय, बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला अन् तापीच्या आजाराची साथदेखील सुरू आहे. एकाच वेळी विविध आजारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
आजार लवकर बरा होत नसल्याने स्वाइन फ्लू, चिकुनगुनियासदृश लक्षण आढळून येत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दवाखाने, रुग्णालये हाउसफुल्ल झाले आहेत. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास घाबरण्यासारखे कारण नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे; परंतु आजारच होऊ नये म्हणून नागरिकांनी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करा, असा सल्लाही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola