वाडेगाव (प्रतिनिधी) : वाडेगांव येथे श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल मध्ये, शासनाच्या गोवर -रुबेला लसीकरणाची 2रा टप्प्याची मोहीम शुक्रवार दि. 18 जानेवारी 2019 ला संपन्न झाली आहे. यात पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना लस टोचण्यात आली आहे.
शासकीय असो की, सामाजिक प्रत्येक उपक्रमात वाडेगांव येथील श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल, अग्रेसर असते. त्याच अनुषंगाने शाळेने केंद्र शासनाच्या गोवर -रुबेला लसीकरणाची मोहीम राबविली.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगांव येथिल डाॅक्टर व त्यांचे आरोग्य सेवकांचे व सेविकांचे पथके उपस्थित होते. एकूण दोन पथकामार्फत लसीकरण सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. शाळेच्या एकुण बाकी असलेल्या 189 विद्यार्थ्यांन पैकी 150 लाभार्थी बालकांनी लसीकरणचा लाभ घेतला आहे. आता पर्यंत 1089 विद्यार्थ्यांन पैकी 1048 लाभार्थी बालकांनी लसीकरणचा लाभ घेतला आहे. आता फक्त 39 विद्यार्थी आजारी व डाॅक्टरांनी नकार दिल्यामुळे लसीकरणाचे बाकी आहेत. म्हणजे शाळेचे गोवर – रुबेला लसीकरणाचे उद्दीष्ट 97 %पुर्ण झालेले आहे .
मुख्याध्यापक एम. डी मानकर व शाळेतील सर्व शिक्षकांचे योग्य असे नियोजन व पालकांचे सहकार्या मुळे गोवर – रुबेला लसीकरणाची मोहीम कोणताही अनर्थ न घडता उत्साहात पार पडली.
गोवर – रुबेला लसीकरणाची मोहीम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक एम. डी मानकर, गोपाल मानकर सर, प्रणव मानकर सर, उगले सर, राहुडकार सर, भोंडे मॅडम, ढगे सर, पाटीलखेडे सर, मंगेश सरप, सागर येवले, शिक्षक बंधु – भगिणी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
मुख्याध्यापक एम. डी. मानकर सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅक्टर व त्यांचे आरोग्य सेवक व सेविकांचे पथक व उपस्थित पालकांचे आभार मानुन सर्वांना धन्यवाद दिलेत.
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola