अकोला (प्रतिनिधी) : अकोला शहरात चारचाकी वाहनाने गोमांस येत असल्याची गुप्त माहिती, सिटी कोतवाली डीबी पोलीस पथकाला मिळल्यावरून, पोलीस मुख्यालय जवळील लक्झरी बस स्थानक येथे,सकाळी ७.३० वाजता हुंडाई कंपनीची एस्सेण्ट कार क्रमांक एम.एच.डब्ल्यू ०६- १७५८ची थांबवून झडती घेतली असता, गाडीमध्ये १००किलो गोमांस मिळून आले.
पोलिसांनी यावेळी गाडीसह शेख रेहान शेख युनूस कुरेशी, (वय २६ वर्ष) , रा. नूरणी मजीद ,सिंधी कॅम्प खदान अकोला याला ताब्यात घेतले. पोलिस हेडकोन्स्टेबल निलेश गोरे यांच्या फिर्यादीवरून, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५,५ (क) ९ (अ) सहकलम भा. द. वि. कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस कॉन्स्टेबल नदीम,अमित दुबे,रमेश महाजन आणि चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख मुजफ्फर यांनी केली.
सिटी कोतवाली पोलिसांनी १६जानेवारीच्या सकाळी ७.३०वाजता लक्झरी बसस्थानकाजवळ पकडलेले गोमांस हे वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथून अकोल्यात आणले असले तरी,रिसोड येथे गोमांसाची कत्तल कोणी केली आणि अकोला येथे हे गोमांस कोणाकडे आले होते.याची चौकशी करुन कोतवाली पोलीस मुख्य सुत्रधाराच्या पर्यंत पोहचतील काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अधिक वाचा : अकोट ते खंडवा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग सातपुड्याच्या जंगलातुन न जाणार पर्यायी मार्गाने !
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola