दहिहांडा (शब्बीर खान) : अकोला शहरात महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय खोदकाम करून,केबल टाकण्यात आल्याने,जिओ कंपनीच्या विरोधात रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार दिनांक ८ जानेवारी २०१९रोजी, दुपारी ४ वाजता दरम्यान, तापडिया नगरातील सायली अपार्टमेंट समोर, जिओ कंपनीच्या कंत्राटदाराने विनापरवाना खोदकाम करून केबल टाकल्याने, अकोला महानगरपालिकेचे विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल प्रकाश डोईफोडे, यांच्या तक्रारीवरून जिओ कंपनीचे कंत्राटदार इम्रानखान अब्दुल रहेमान,रा.पिल काँलीनी,कौलखेड, अकोला, यांच्या विरोधात शहराचे विद्रुपीकरण कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तापडिया नगरातील सायली अपार्टमेंट समोर विनापरवाना खोदकाम करून,इमारतीच्या वर जिओ कंपनीच्या ठेकरदाराने काही मजुरांच्या मदतीने केबल टाकले होते.
हे महानगरपालिकेच्याविशेष पथकाच्या पाहणी दरम्यान आढळून आले होते, या जिओ कंपनीने या कामासाठी कोणत्याही प्रकारची रीतसर परवानगी घेतली नसल्याची खात्री झाल्यावर,दिनांक१५जानेवारी सायंकाळी अकोला महापालिका विद्युत विभागाचे उपअभियंता अमोल डोईफोडे यांनी तक्रार दिली, त्यावरून रामदास पेठ पोलिसांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगरचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार शैलेश सपकाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास राठोड, पो. कॉन्स्टेबल वाटूरक करीत आहेत.
विशेष महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे, याच कंपनीच्या कंत्राटदाराने विनापरवाना खोदकाम करून,केबल टाकले होते, तेव्हा त्यांना समज देहूनही ८जानेवारी रोजी विनापरवाना काम केल्याने,महापालिका प्रशासनाने केबलसह,इतरही साहित्य जप्त केले आहे.
अधिक वाचा : चेक अनादर प्रकरणी आरोपीची कारागृहात रवानगी!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola