अकोला (प्रतिनिधी) – अकोट तालुक्यातील कासोद शिवपूर येथील जिल्हा परिषद शाळेत मंजूर पैकी ५० टक्केच िशक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सोमवारी थेट जिल्हा परिषदेत धाव घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) कक्षात धाव घेतली. याच िंठकाणी विद्यार्थ्यांनी वर्ग भरवत प्रथम राष्ट्रगीतही म्हटले. परिणामी चर्चेसाठी आलेले सर्व अधिकारी-सदस्य सावधान स्थितीत उभे झाले.
सीईओेंच्या कक्षात या वेळी काँग्रेस, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी आक्रमक होत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीच केली. परिणामी प्रशासनाने तातडीने दोन शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेशच जारी केले. या शाळेतील मुख्याध्यापकपदही रिक्त आहे, हे येथे उल्लेखनीय. आंतरजिल्हा बदली, प्रतिनियुक्ती, बदली, भरतीसाठी जि.प.मध्ये साखळीच सक्रिय आहे.
आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी तर संबंधित शिक्षकांकडून लाखो रुपये उकळण्यात येतात. अनेकदा तर एकतर्फी बदलीने शिक्षक अकोल्यात रुजू होतात. यापूर्वी अकोल्यात रुजू करुन घेताना त्या प्रवर्गातील जागा रिक्त आहे कि नाही,याचीही खातरजमा करण्यात आली नव्हती. त्यानंतर शिक्षकांच्या अनेक प्रलंबित मागण्यांबाबत पालकमंत्री ते ग्राम विकास मंत्र्यांच्या स्तरापर्यंत बैठका घेऊन त्या साेडवण्याचे अादेश दिल्यानंतरही प्रशासन संथच अाहे. दरम्यान शिक्षण विभागाचा गलथान कारभार साेमवारी विद्यार्थी व सदस्यांनी घेतलेल्या अाक्रमक पवित्र्याच्या निमित्ताने चव्हाट्यावर अाला. कासाेद शिवपूर येथील जिल्हा परिषद शाळेत पुरेसे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट सीईओेंच्या कक्षात घेतली. या वेळी कांॅग्रेसचे िज.प.सदस्य बाळासाहेब बाेंद्रे, शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, उपशिक्षणाधिकारी रताळे, सरपंच किशोर बाेंद्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख सलिम, उपाध्यक्ष संजय बाेंद्रे, डिगांबर तायडे, गाैतम तायडे, महादेव राऊत, भास्कर पळसकर अादी उपस्थित हाेते.
शिक्षक अतिरिक्त असतानाही नियुक्त हाेईना : गतवर्षी बिंदूनामावली प्रक्रिया राबवण्यात अाली. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास ६४ शिक्षकांची सेवा समाप्त करण्यात अाली हाेती. त्यानंतर शिक्षकांनी अायुक्त कार्यालय, न्यायालयात धाव घेतली. दाेन्ही यंत्रणांच्या अादेशाने ५० शिक्षकांना रूजू करुन घेण्यात अाले. १४ शिक्षकांना रुजू करुन घेण्यात अाले नाहीत. त्यामुळे आधीच ३४ आणि हे १४ असे एकूण ४९ शिक्षक अतिरिक्त हाेणार अाहेत. या २१ शिक्षकांना रूजू करुन घेतल्यास अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढणार आहे. एकीकडे माेठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त असतानाही दुसरीकडे मात्र शिक्षक कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांवर आंदाेलन करण्याची वेळ अाली अाहे. सदस्यांचा सवाल-समायाेजनाची जबाबदारी काेणाची; अधिकारी म्हणाले समायोजन हाेणे अावश्यकच हाेते. विद्यार्थ्यांनी प्रथम थेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) कक्षाकडे धाव घेतली. मात्र सीइओ रजेवर असलेल्या त्यांच्या कक्षाला कुलूप हाेते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बाहेरच्या जागेत एका रांगेत बसले.
जि.प.सदस्य बाळासाहेब बाेंद्रे यांनी इतर अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर सीईओचा कक्ष उघडण्यात अाला. कक्षात सदस्य बाेंद्रे यांनी मुख्याध्यापकांची किती पदे रिक्त आहेत, असा सवाल उपशिक्षणाधिकाऱ्यांना केला. यावर त्यांना १९ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात अाले. समायोजन करुन रिक्त पदे का भरण्यात आली नाहीत, ही जबाबदारी काेणाची हाेती, अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्तीच बाेंद्रे यांनी केली. यावर उपशिक्षणाधिकाऱ्यांनी समायोजन हाेणे अावश्यक हाेते, याची कबुली दिली. तसेच नंतर त्यांनी कासाेद शिवपूर येथील शाळेतील शिक्षकांच्या पदांची माहिती मोबाइल फाेनद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेतली. अखेर दीपक भास्कर आणि अरूणा हिंगणे यांची नियुक्ती करण्यात आली.
अशी आहे ‘त्या’ शाळेची स्थिती
जिल्हा परिषदेच्या कासोद शिवपूर येथील शाळेत १५६ विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत. शिक्षकांची मंजूर पदे ८ असून, कागदोपत्री नियुक्तीही ८ शिक्षकांची आहेत. मात्र एक शिक्षिका प्रसूती रजेवर असून, एक शिक्षक आजारी रजेवर आहे. दोन शिक्षक क्रीडा स्पर्धेत व्यस्त आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष चारच शिक्षकांवर शाळेचा डोलारा उभा असून, मुख्याध्यापक पद तर रिक्तच आहे.
अधिक वाचा : शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या पंधरा दिवसात निकाली काढण्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे निर्देश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola