ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत पराभूत केल्याने टीम इंडियाचा संघ वाहवा मिळवत आहे. मात्र याच कसोटी संघात असलेले हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी लागण्याची शक्यता आहे.
‘कॉफी विथ करण’ या शो मध्ये या दोघांनी मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी काही आक्षेपार्ह विधाने केली असल्याचे दिसून आले. यावरून BCCI ने या दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
या दोघांनी आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल या दोघांवर २ एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घालण्यात यावी असे मत BCCI च्या प्रशासकीय समितीचे CoA अध्यक्ष विनोद राय यांनी केले आहे, तर या समितीतील महिला सदस्या डायना एडलजी यांनी मात्र हे प्रकरण BCCI च्या कायदे समितीकडे वर्ग करण्याचे मत व्यक्त केले आहे.
हार्दिकने दिलेले स्पष्टीकरण मला पटलेले नाही. त्यामुळे मी या गोष्टीसाठी त्या दोन्ही खेळाडूंना दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्यात यावी असे मत मांडले आहे. पण याबाबत अंतिम निर्णय हा डायना एडलजी यांच्याशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे विनोद राय यांनी सांगितले.
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या दोघांनी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे या दोघांवर प्रचंड टीका होत आहे. या दोघांनी केलेली विधाने BCCI ला चांगलीच खटकली. अशा विधानांमुळे BCCI ची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे या दोघांना या शो दरम्यान केलेल्या वक्तव्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.
दरम्यान, सोशल मीडियावर टिकेचा होणारा भडीमार पाहता हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांची माफी मागत, महिला वर्गाचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे म्हटले होते.
अधिक वाचा : IPL Season 12 भारतामध्येच रंगणार, 23 मार्च 2019 पासून सामने!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola