‘बॉलिवूड क्वीन’ कंगना राणावत हिच्या जबरदस्त लूकमुळं चर्चेत असलेला बहुप्रतिक्षित ‘मणिकर्णिका‘ हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अजून वेळ असला तरी यातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
‘विजयी भव‘ असे बोल असलेल्या गाण्यात झाशीच्या राणीचे शौर्य, औदार्य आणि राजकीय चातुर्याचं वर्णन करण्यात आलं आहे.
झाशीतील सर्वसामान्य महिलांना राणी लक्ष्मीबाई युद्धासाठी तयार करत असल्याचं, त्यांना युद्धाचं प्रशिक्षण देत असल्याचं दिसत आहे. आयुष्यातील कडवट अनुभव पचवून देशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज होणाऱ्या झाशीच्या राणीचं रूप या गाण्यातून दिसतंय. यु्द्धाचा एल्गार करणाऱ्या या गाण्याचे बोल प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिले आहेत, तर, संगीत शंकर-एहसान-लॉय यांचं आहे. ‘मणिकर्णिका’ येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असून या चित्रपटासाठी कंगनाचे चाहते उत्सुक आहेत.
अधिक वाचा : MeToo : आलोक नाथ यांना अटकपूर्व जामीन मंजूर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola