अकोला (प्रतिनिधी) : राज्य शासनाने सन 2017-2018 करीता उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड केल्याबददल जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव झाला. अकोला जिल्हयात नाविण्यपूर्ण संकल्पना राबवून जिल्हयाच्या नावलौकिकात भर घातल्याबददल शासनाने या कामांची विशेष दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांची अमरावती विभागातून उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून निवड केली आहे.
जिल्हाधिकारी आज सकाळी आपल्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. महिला कर्मचाऱ्यांनी त्यांना कुंकुमतिलक केले. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यानंतर नियोजन भवनात उत्स्फुर्तपणे गौरवासाठी जमलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, उपजिल्हाधिकारी (निवडणुक) वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खवले आदींसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, मला मिळालेला बहुमान हा माझ्या एकटयाचा नाही, तर सर्वसामान्यांच्या हितासाठी तुम्ही ज्या समर्पण भावनेने काम केले आहे, त्याचे हे प्रतिबिंब आहे. हा संपूर्ण जिल्हयाचा गौरव आहे. या पुढेही शासनाचे लोककल्याणकारी उपक्रम सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्याचे काम तुम्ही अविरतपणे करावे आणि आपल्या अकोला जिल्हयाचा सर्वांगिण विकास साधावा.
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मागील दीड वर्षांत अकोला जिल्हयात विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून जिल्हयाचा देशपातळीवर नावलौकीक वाढवला आहे. लोकसहभागातून त्यांनी राबविलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व शेतकरी, गरीब व वंचितांना मिळण्यासाठी विशेष मोहिम राबविली. याशिवाय जिल्हयातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. तसेच भाजीपाला निर्यात कराराच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मोठी संधी उपलब्ध करुन दिली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांसोबत एक दिवस उपक्रम त्यांनी राबविला.
अधिक वाचा : अकोला मनपा ने कर थकीत असलेली मालमत्ता केली सील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola