अकोला :- सर्वोपचार रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. या रुग्णालयांत येणारे रूग्ण व त्यांच्या सोबतचे नातेवाईक गरीब कुटूंबातील असतात. त्या रुग्णांच्या नातेवाईकाला यापुढे जेवणाची व्यवस्था व्हावी व ते उपाशीपोटी राहता कामा नये यासाठी शहरातील तसेच जिल्हयातील दानशुर व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
आज दि. 5 जानेवारी रोजी सर्वोपचार रुग्णालयाल व शासकीय वैद्यकीय महाविदयालयाला त्यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या सोबत यावेळी शासकीय वैद्यकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. अशोक जैन, डॉ. संजय चांडक, नगरसेवक आशिष पवित्रकार, दिपक मायी, शरद झांबरे पाटील व मिरॅकल ग्रुपचे सदस्य यांची उपस्थिती होती. सर्वोपचार रुग्णालयामध्ये भरती असलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकासाठी काहीतरी करण्याची तळमळ नेहमी पालकमंत्री यांची होती. त्यांनी या बाबत नविन वर्षाला संकल्प केला. सर्वोपचार रुग्णालयामध्ये येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांची एक वेळची जेवनाची व्यवस्था झाली पाहीजे यासाठी त्यांनी आवाहनही अनेक सामाजिक संघटनांना केले होते. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या प्रेरणेने व मिरॅकल ग्रुप अकोला व्दारा संचालीत आधार फाऊंडेशन तर्फे येथील सर्वोपचार रुग्णालयामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.
पालकमंत्री यांच्या आवाहनाने प्रेरीत होऊन मिरॅकल ग्रुप अकोला यांनी आठवडयाच्या दर शनिवारी या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवन दिले जाईल असे जाहिर केले. त्या कार्यक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले. डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते रूग्णांच्या नातेवाईकांना जेवन देण्यात आले. या कार्यक्रमाबद्दल पालकमंत्र्यांनी मिरॅकल ग्रुपच्या अध्यक्षा डॉ. सौ. पुनम चांडक व सचिव प्रियंका शाहू यांचे कौतुक केले.प्रत्येकांनी आपल्या वाढदिवसाला काहीही खर्च न करता अशा प्रकारचे उपक्रम राबवावयाचे तसेच रुग्णांना आवश्यक वस्तुचे वाटप करण्याचे आवाहन डॉ. रणजीत पाटील यांनी केले. यावेळी मिरॅकल ग्रुपचे सदस्य व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
अधिक वाचा : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या वक्तव्याचा सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने केला जाहीर निषेध
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola