अकोला – निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणुक विभागाच्यावतीने जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमेला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आज दि. 3 जानेवारी रोजी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनी अकोट शहरातील उर्दु उच्च माध्यमिक शाळा, नगरपालीका प्राथमिक मराठी शाळा, मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळा, तेल्हारा तालुक्यातील सेठ बन्सीधर प्रा. मराठी शाळा, बाळापूर तालुक्यातील मोरगाव सा., उरळ बु., उरळ खु., झुरळ बु., पातुर तालुक्यातील चरणगाव, अंबाशी, आसोला, बेलतळा, अकोला पश्चिममधील तारफैल, विजयनगर, खदान कॅम्प नवीन, मूर्तिजापूर शहरातील पुंडलीक नगर, तालुक्यातील जांभा खु. शिरसो, बार्शिटाकळी तालुक्यातील पारडी, टाकळी पोटे, खांबोरा येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची प्रात्यशिकासह मतदारांना माहिती दिली. यावेळी स्वत: नागरिकांनी सदर यंत्रांचे प्रात्यक्षिक करुन पाहिले. त्यांच्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले. सदर यंत्रांची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
दि. 4 जानेवारी रोजीचे जनजागृती कार्यक्रम दरम्यान, दि. 4 जानेवारी रोजी अकोट शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळा, जि.प. माध्यमिक विदयालय, शिवाजी माध्यमिक शाळा, नगर पालिका मराठी शाळा, तेल्हारा शहरातील शिवाजी हायस्कूल, बाळापूर तालुक्यातील डोंगरगाव, कळंबा खु, कळंबी महा, अकोला पश्चिममधील दामले चौक, मोहता मिल, मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर, ब्रम्ही खु, ब्रम्ही बु, ब्रम्ही, लंगापूर, पोही, बार्शिटाकळी तालुक्यातील मोरगाव काकड, कानशिवणी, देवळी, अकोला पूर्वमधील म्हैसांग, मजलापूर, रामगाव, कासली खु, कासली बु, मारोडी, अपोती खु येथे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र(इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत माहिती दिली जाणार आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
अधिक वाचा : जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची जनजागृती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola