अकोला – मा. मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार अकोला जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) व व्हिव्हिपॅट बाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने निवडणुक विभागाच्यावतीने दि. 26 डिसेंबरपासून जिल्हयातील विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदान केंद्रावर ईव्हीएम व व्हिव्हिपॅटबाबत जनजागृती अभियान राबविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील किनखेड पुर्णा या गावी जावून तेथील नागरीकांना ईव्हीएम व व्हिव्हिपॅटबाबत माहिती दिली. तसेच उपस्थित नागरीकांनी स्वत: ई.व्ही.एम मशिन्सवर प्रात्यक्षीक मतदान करुन व्हिव्हिपॅट मशिन्सद्वारे आपण केलेल्या मतदानाची खात्री सुध्दा केली. यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार तहसिलदार विश्वनाथ घुगे, तसेच गावातील नागरीक मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
अधिक वाचा : लोकशाही पंधरवाडादरम्यान मनपा करणार मतदार नोंदणीसाठी जनजागृती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola