अकोला – अकोला या २०० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार अाहे. या विद्युतीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला दोन ते तीन महिन्यांत सुरुवात होणार आहे, तर संपूर्ण काम दोन वर्षांमध्ये पूर्ण होणार अाहे. त्यामुळे मराठवाडा – विदर्भ आणि उत्तर – दक्षिण भारत ते भाग आणखी जवळ येणार आहेत.
सुमारे २०० किलोमीटर अंतर असलेल्या पूर्णा – अकोला या लोहमार्गाचे दहा वर्षांपूर्वी मीटर गेजमधून ब्रॉडगेज रुंदीकरण झाले आहे. त्यामुळे या लोहमार्गावरून उत्तर व दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे गाड्या मोठ्या प्रमाणात आज धावत आहेत. त्यामध्ये जयपूर, अजमेर, दिल्ली, इंदोर, सिकंदराबाद, काकीनाडा, यशवंतपूर, हैदराबाद आदी रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. पूर्णा आणि अकोला रेल्वे स्टेशन दोन्ही रेल्वे स्थानके जंक्शन असून त्याठिकाणाहून वेगवेगळ्या दिशांनी रेल्वे गाड्या जात असतात. त्यामुळे या दोन्ही रेल्वेस्थानकावर रेल्वे गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
पूर्णा- अकोला या दोनशे किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरण कामाला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. याबाबत एक महिन्यापूर्वी नांदेड येथे झालेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बैठकीत नांदेड विभागाच्या मुख्य रेल्वे प्रबंधकांनी लोकप्रतिनिधींना माहिती दिली होती. या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी प्रतिकिलोमीटर सुमारे १ कोटीनुसार रेल्वे मंत्रालयाने २१० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या कामाची निविदा निघण्यास ठरलेल्या वेळेपेक्षा दोन महिने उशीर झाला असला, तरी दीड महिन्यात या कामाची निविदा निघणार आहे, तर त्यानंतर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण कामाला लगेच सुरुवात होणार आहे.
दीड ते दोन वर्षांमध्ये संपूर्ण दोनशे किलोमीटर विद्युतीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य अाहे. त्यानंतर या महामार्गावर सर्व रेल्वेगाड्या विजेवर चालणार आहेत. या विद्युतीकरणाचा सर्वात मोठा फायदा लांब पल्ल्याच्या गाड्यांना होणार आहे. या रेल्वे गाड्यांना आता अकोला रेल्वे स्टेशनवर डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिन बदलण्याची गरज त्यामुळे भासणार नाही. इंजिन बदलण्याच्या कामात अर्धा ते पाऊण तास वेळ जात असतो. हा वेळ वाचणार अाहे. त्याचा फायदा रेल्वे आणि प्रवाशांना होणार आहे.
वसमत फाटा ते वाटूर या ११४.८५ किलोमीटर लांबीच्या महामार्गामुळे हिंगोली, परभणी व जालना जिल्ह्यांमधील मागास भागांचे भाग्य उजळणार आहे. हा महामार्ग थेट जालना येथे होऊ घातलेल्या ड्रायपोर्टशी जोडला जात असल्याने, शेतकऱ्यांचा कृषिमाल प्रक्रिया उद्योगात जाऊन कृषी व्यवस्था भक्कम होण्यास मोलाची मदत होणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola