अकोला : अकोला महानगरपालिका शिक्षण विभाग आणि दास मोबाईल सेल्स व सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवारी (ता. २७) मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहात महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनपा उपायुक्त सुमंत मोरे, प्रशासन अधिकारी कुणाल राईकवार, नगर सचिव अनिल बिडवे प्रामुख्याने उपस्थित होते.
अकोला मनपाच्या अधिनस्त असलेल्या ३३ शाळांमधील मराठी, हिंदी, उर्दू व गुजरातील माध्यमातील विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. वर्ग १ ते ३, वर्ग ४ ते ५ आणि वर्ग ६ ते ८ अशा तीन गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सर्व गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके देण्यात आलीत. यावेळी महापौर विजय अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याच्या दृष्टीने अशा स्पर्धा फायदेशीर ठरतात, असे सांगत फेब्रुवारी २०१९ मध्ये मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे संचालन वैशाली शेंडे यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन गजेंद्र ढवळे यांनी केले. यावेळी दास मोबाईलचे संचालक रितेश मिर्जापुरे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सहायक शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक वाचा : शेतक-यांनी गटशेतीकडे वळावे -पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे आवाहन
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola