अकोला – दिवसेंदिवस शेतक-याकडील शेती कमी होत चालली आहे. शासनाने गट शेती करण्यासाठी विविध योजना लागु केल्या आहेत. गावातील किमान 50 पेक्षा जास्त शेतक-यांच्या गट बनवुन शेती करावी असे आवाहन गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिडांगणावर आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पाच दिवसीय ॲग्रोटेक – 2018 या राज्यस्तरिय भव्य कृषी प्रदर्शनी व चर्चासत्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी खासदार तथा महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे उपाध्यक्ष ॲड. संजय धोत्रे , विद्यापिठाच्या कार्यकारी समितीचे सदस्य तथा आमदार गोपीकिशन बाजोरीया , विद्यापिठाच्या कार्यकारी समितीचे सदस्य तथा आमदार रणधिर सावरकर, कृषि विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य जैनूद्दीन जव्हेरी, महापौर विजय अग्रवाल, प्रगतीशील शेतकरी तथा कृषि विद्यापिठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य गणेश कंडारकर , विनायक सरनाईक, विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे,आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, कृषि विद्यापीठ परभणीचे विस्तार शिक्षण संचालक प्रदिप इंगोले, कृषी अभियांत्रीकी अधिष्ठाता डॉ.नागदेवे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. दिलीप मानकर, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थीती होती. डॉ. रणजीत पाटील पुढे म्हणाले की ,शेतक-यांनी परंपरागत शेती न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी उत्पादन खर्च आणि जास्त उत्पादन देणारे वाण पिकवावे, सेंद्रीय शेतीला प्राधान्य दयावे.
गोधनामुळे शेती समृध्द होत असल्यामुळे शेतक-यांनी आपल्या गोधनात वाढ करावी, असे आवाहन त्यांनी शेतक-यांना केले. शासनाच्या धोरणामुळे शेतक-यांसाठी असलेल्या व्यक्तीगत लाभाच्या योजनेचा लाभ थेट शेतक-यांच्या खात्यात जमा होत आहे. यामुळे पारदर्शकता निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार , खारपाणपट्टयासाठी हवामानावर आधारीत पिक पेरणी योजना यासारख्या योजनामुळे शाश्वत शेती करून शेतक-यांनी शेतीतील गुंतवणूक वाढवावी तसेच कौशल्य विकासाच्या योजनांतून शेतक-यांच्या मुलांच्या हाताला कौशल्य निर्माण करून शेतीवर प्रक्रिया असणारे उदयोग सुरू करावे असे सांगुन पालकमंत्री पुढे म्हणाले की, कृषी विद्यापिठांनी संशोधन करुन नवनविन वान संशोधीत करावे, शेतक-यांना विज, पाणी व शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी शासन कटीबध्द असुन कृषी विद्यापीठांनी संशोधन व तंत्रज्ञान पोहचविण्याची जबाबदारी घ्यावी असे प्रतिपादन डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
शेतक-यांनी कृषी विद्यापिठाने आयोजीत केलेल्या कृषी प्रदर्शनी व चर्चासत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापिठाने शेतक-यांवर आलेले कपाशी पिकांवरील गुलाबी बोंड अळीचे संकट विदयापीठी , कृषि विभाग , कृषि विज्ञान केंद्र , आयसीआर व स्वत: शेतक-यांनी समन्वय साधुन संकट दुर केले आहे. याबद्दल सर्वांचे आभार युक्त कौतुक केले पाहिजे. असे सांगुन खासदार संजय धोत्रे पुढे म्हणाले की शेतीचा समतोल बिघडत चाललेला आहे. अनेक समस्या निर्माण होत आहे. गोधन कमी होत आहे. प्लास्टिकचा वापर वाढलेला होता. परंतू शासनाने प्लास्टिक वर बंदी घालून प्लास्टीकचा वापर कमी केला आहे. यामुळे शेतक-यांना सुवर्ण संधी प्राप्त् झाली आहे.
विद्यापिठांनी संशोधन करतांना शेतक-यांना केंद्रस्थानी राहून संशोधन करावे व शासनाने धोरण ठरवितांना शेतक-यांशी समन्वय साधुन धोरण ठरवावी. शासनाने शेतक-यांच्या हिताची कामे करावी यासाठी सर्व विभागांनी शासनाला सहकार्य करण आवश्यक असल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी सांगितले. कृषि विदयापीठातर्फे संशोधन , शिक्षण व विस्तार शिक्षणाचे कार्यक्रम सतत घेण्यात येत असतात. शेतक-यासाठी लोकाभिमुख संशोधन व्हावे यासाठी विदयापीठ सतत प्रयत्न करीत असतात. संशोधनाच्या माध्यमातुन कमी खर्चाची शेती कशी करावी यासाठी विदयापीठ शेतक-यांना मार्गदर्शन करीत असते मागील वर्षी विदयापीठ 1 हजाराहुन जास्त गावात पोहचले आहे.
अशी माहिती विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले यांनी प्रास्ताविकातून दिली. सर्वप्रथम दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विद्यापिठाने काठलेन्या कृषीसंजीवनी -2019 व कृषि दिनदर्शिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कृषि प्रक्रिया विशेषांक, संशोधन संचालनातर्फे व्हिजन 2050, विदर्भातील गुलाबी बोंड अळी अभियान 2018-19, महाराष्ट्रातील पिकांकरीता सुक्ष्म अन्यद्रव्याच्या शिफारशी अशा विद्यापिठाच्या विविध विभागाने काढलेल्या वेगवेगळया पुस्तीकेचे विमोचन करण्यात आले. तत्पुर्वी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील ,खासदार संजय धोत्र व इतर मान्यवरांनी यांनी यावेळी प्रदर्शनीमध्ये उभारलेल्या विविध स्टॉलला भेट दिली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रदिप बोरकर व उपस्थितीचे आभार आत्माचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले. यावेळी विद्यापिठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक , अधिकारी, जनसंपर्क अधिकारी डॉ.किशोर बिडवे ,कर्मचारी, प्रगतीशील शेतकरी स्टॉलधारक व शेतकरी उपस्थित होते.
अधिक वाचा : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत विविध गावांमध्ये प्रात्यशिकासह देण्यात आली माहिती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola