अकोला (प्रतिनिधी) : भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन औरंगाबाद येथे २१ व २२ डिसेंबरला संपन्न झाले. यावेळी राष्ट्रीय मार्गदर्शक अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सम्यकचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेश भारतीय सर यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन महाराष्ट्र राज्य सचिवपदी हितेश जामनिक,सदस्यपदी राजकुमार दामोदर,अमोल सिरसाट तर सांस्कृतीक विभागाच्या प्रमुखपदी आदेश आटोटे,सदस्यपदी भाग्यश्री इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील पाच जणांची एकाच वेळी वर्णी लागल्याने सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्ह्याचे महत्त्व वाढले असुन सर्वस्तरातुन आनंद व्यक्त होत आहे.त्याचमुळे सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा महानगर च्या वतिने नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सत्कार जि.प.सर्किट हाऊस येथे करण्यात आले.
यावेळी सम्यकचे अमरावती विभागीय अध्यक्ष नितेश किर्तक,महानगराध्यक्ष आकाश गवई,धिरज इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष योगेश किर्तक, महानगर महासचिव पवन गजानन गवई,अक्षय डोंगरे,अकोट तालुकाध्यक्ष भुषण घनबहादुर,प्रसिद्धी प्रमुख रितेश किर्तक,प्रकाश प्रधान,शुक्लोधन डोंगरे,प्रेमकुमार वानखडे,प्रकाश शेंडे,राहुल इंगळे,सुमित वानखडे,प्रकाश शिरसाट यांच्यासह सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रितेश किर्तक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola