मुंबई – केंद्र सरकारच्या धर्तीवर महापालिकेतील पुरुष कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीवेळी दोन आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आली. ही ठरावाची सूचना पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे.गेल्या काही वर्षां मध्ये मुंबईत विभक्त कुटुंब पद्धती दिसून येत आहे.
विभक्त कुटुंब पद्धतील गर्भवतीस्त्रीच्या प्रसूतीच्या काळात तिची काळजी घेण्यासाठी कोणी अनुभवी व्यक्ती बरोबर नसते. त्यामुळे तिच्या पतीला मदतीसाठी तिच्याबरोबर राहणे गरजेचे असते. मात्र त्या पुरुष कर्मचार्याला कार्यालयीन कामकाजामुळे सुट्टी घेऊन पत्नीच्या मदतीला घरी राहता येत नाही. मातृत्व लाभ अधिनियम लागू असलेल्या खासगी, सरकारी आणि महापालिकेतील महिला कर्मचार्यांना प्रसूती काळात २४ आठवड्यांची रजा देण्यात येते.
मात्र पुरुष कर्मचार्यांना या काळात रजा मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. त्यामुळे बाळाची काळजी घेण्यासाठी केंद्रीय कर्मचार्यांना मिळणार्या पितृत्व रजेचा लाभ देण्याची मागणी शिवसेनेचे समाधान सरवणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिका महासभेत शुक्रवारी केली.
अधिक वाचा : शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लोक संवाद’
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola