बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौतचा बहुचर्चित ठरत असलेला ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असून यात कंगना राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत आहे. या चित्रपटामध्ये कंगना व्यतिरिक्त अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता डॅनी डेन्झोप्पादेखील झळकणार आहेत. यात डॅनी यांच्या भूमिकेवरील पडदा उचलण्यात आला असून त्यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.
डॅनी यांनी या चित्रपटामध्ये गुलाम गौस खान यांची भूमिका वठविली असून गुलाम गौस खान हे राणी लक्ष्मीबाई यांचे मुख्य सेनापती होती. प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये डॅनी एका योद्धाच्या रुपात दिसत असून ते घोडेस्वारी करताना दिसत आहेत.
दरम्यान, काही दिवसापूर्वी या चित्रपटातील अंकिताचा लूक समोर आला होता. या चित्रपटात अंकिताने झलकारी बाईची भूमिका वठविली आहे. तिचा लूक पाहता प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली होती. त्यात आता डॅनी यांचा लूकही समोर आला आहे.
मध्यंतरी डॅनी बायोस्कोपवाला या चित्रपटात झळकले होते. त्यानंतर त्यांनी मोठ्या पडद्यापासून फारकत घेतली होती. मात्र आता ते मणिकर्णिकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटानंतर ते बॅटल ऑफ सारागढ़ीमध्येही झळकणार आहेत. या चित्रपटामध्ये त्यांनी अफगान सरदारची भूमिका वठविली आहे.
अधिक वाचा : ‘सोन चिडियाँ’चे फर्स्ट पोस्टर , टीझर प्रदर्शित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola