तेल्हारा (विशाल नांदोकार) – राष्टीय आरोग्य अभियानाअंतर्गत येथील स्वामी विवेकानंद ज्ञानपीठमध्ये गोवर रुबेला लसीकरण मोहीम यशस्वी होण्या करीता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याविषयी मान्यवरांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. आरोग्य विभागाकडुन राबविन्यात येत असलेल्या गोवर रुबेला आजारावरील लसिकरण मोहीमेचे आयोजन तेल्हारा येथील स्वामी विवेकानंदन ज्ञानपीठ येथे येत्या 24 डिसेंबरला आयोजन करन्यात आले आहे.
यापुर्वी पालकांना व विद्यार्थ्यांना तेल्हारा ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. तापडिया व शिक्षकांनी मार्गदर्शक आणी लसिकरणाचे महत्व पटवुन देत जागृती केली. दि.24 डिसेंबर रोजी ११ वाजता आरोग्य पथकाद्वारे शाळेमध्ये येवुन विद्यार्थ्यांना लसिकरण करण्यात येईल असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वर्षा पारस्कार यांनी सांगितले. यावेळी संस्थेची कार्यरिणी, शाळेचे शिक्षकवृंद, डॉ तापडिया, डॉ सौ तराडे, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola