तेल्हारा (प्रतिनिधी)- आज दि. १२ डिसेंबर रोज बुधवार रोजी राष्ट्रीय अध्यक्ष,मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तेल्हारा शहर व तालुक्याच्या वतीने सकाळी १०.०० वाजता सामान्य ग्रामीण रूग्नालय तेल्हारा येथे रूग्नांना फळ वाटप करण्यात आले व ११.०० वाजता ग्राम बेलखेड येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा महिलांना साळीचोळी वाटप करण्यात आली.
दुपारी ३.०० वाजता जि.प.प्राथमिक शाळा थार येथे ५१ मुलीव मुलांना शालेय साहित्य वाटप राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष सारंगधर फोकमारे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष प्रा.प्रदिपभाऊ ढोले, शहर अध्यक्ष दिलीप पिवाल, संपर्क प्रमुख नरेंद्र खुमकर, बालु साळुंके,भास्करराव फोकमारे,महादेव फोकमारे, मुख्याध्यापक देशमुख मॅडम,भोपळे मॅडम,कुयटे मॅडम, ताडे सर उपस्थित होते.
प्रदेशाअध्यक्ष मा.जयंत पाटील साहेब यांच्या आदेशावरून आणि जिल्हा निरीक्षक मा.प्रविणजी कुंटे पाटील व जिल्हाअध्यक्ष,मा.संग्रामभैय्या गावंडे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस(ग्रामीण) पार्टी तेल्हारा तालुकाअध्यक्ष प्रा.प्रदिपभाऊ ढोले व शहरअध्यक्ष दिलीपभाऊ पिवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी महिला तालुकाअध्यक्षा आशाताई ढोले,शहरअध्यक्षा मनिषाताई देशमुख, अनिताताई वाडेकर , सेवादल तालुकाअध्यक्ष सारंधर फोकमारे, महासचिव प्रा. गेबड, प्रा.योगेशभाऊ कोरपे,संपर्क प्रमुख नरेंद्र सा. खुमकर, युवक शहरअध्यक्ष अविनाश विखे, युवानेते मो.सलिमभाई,रामेश्वर कुयटे, बालु साळुंके,प्रविण अरूडकार, गुरूचरणदास खुमकर, अलिमसेठ, अंकीत मलिये, एजाज शाह,अंकीत ठाकरे, वासुदेव खुमकर,अशोकराव खुमकर,रामकृष्ण सोनट्टके,शाम खाडे, गणेश खुमकर,अब्दुला खान,अक्षय,अजय, या सह तालुक्यातिल व शहरातिल बुथप्रमुख,शाखाअध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा : देशातील तीन राज्यात काँग्रेस पक्षाने मुसंडी मारल्याने तेल्हा-यात काँग्रेस पक्षाने साजरा केला विजयोत्सव.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola