अकोला(निलेश किरतकर) – प्रभु श्रीरामचंद्रांपासून छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत राजेशाही आदर्श होती. त्यांची न्यायव्यवस्था आदर्श होती. आज देशामध्ये भ्रष्टाचार, हत्या, बलात्कार, यांत वाढ होत आहे. लोकशाही स्वीकारली असतांनाही आपली ही स्थिती आहे, तर निश्चितच लोकशाहीत काहीतरी त्रुटी असल्याचे लक्षात येते. त्यासाठीच समाजातील दुष्प्रवृत्तींचा नाश आणि उत्तम प्रवृत्ती निर्माण करून हिंदु राष्ट्राची निर्मिती करणे काळाची आवश्यकता आहे. यासाठी श्रीराम सेना हे आपले कार्य करत आहे. अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी गावोगावी शाखा स्थापन करण्यात येत आहेत. आज पातूर तालुक्यातील विवरा येथील शाखेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात करण्यात आले. विवरा येथील ग्रामशाखा प्रमुख म्हणून प्रफुल कुरई तर उपाध्यक्ष म्हणून श्रीकांत धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच ग्रामशाखा सचिव या पदी ज्ञानेश्वर काळदाते यांना नियुक्ती प्रदान करण्यात आले. या उदघाटन प्रसंगी श्रीराम सेनेचे अकोला जिल्हा प्रमुख अँड. पप्पुभाऊ मोरवाल, मोंटूभाऊ अग्रवाल जिल्हा उपाध्यक्ष, मंगेशभाऊ गाडगे (बजरंगी) जिल्हा मंत्री, विजू चव्हाण पातूर तालुका प्रमुख, राजू चव्हाण पातूर शहर प्रमुख तसेच नरेंद्र मोदी विचार मंचचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष शिवराज इंगळे व श्रीराम सेनेचे समस्त पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन आकाश बोराळे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. तसेच मान्यवर पाहुण्यांन्नी यावेळी उपस्थितांना श्रीराम सेनेचे कार्य समजून सांगितले.
आतंकवाद, भ्रष्टाचार, नक्षलवाद यांसारख्या संकटांनी भारताला घेरले असतांना त्यातून बाहेर पडण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अत्यावश्यक झाले आहे. आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रतिदिन साधना करणे आवश्यक आहे. ईश्वरी पाठबळ असेल, तर धर्मकार्यातील अडथळे दूर होऊन निश्चितपणे हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, याची निश्चिती बाळगा. काळ कितीही वाईट असला, तरी भगवंत भक्ताचे रक्षण करणारच आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष अँड. पप्पुभाऊ मोरवाल यांनी यावेळी केले. तसेच श्री राम जन्म भूमी भव्य राम मंदिर संदर्भात भव्य हुंकार सभा 9 डिसेंबर ला चलो खामगाव चा नारा मा. श्री गोपाल जी नागपुरे यांनी यावेळी येथे सर्व हिंदु बांधवांना दिला.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola