Farmers Protest in Delhi
नवी दिल्ली : ‘देशातील यापुढच्या निवडणुका शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर लढल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणाराच यापुढं देशावर राज्य करू शकणार आहे,’ असं सांगतानाच, २०१९ मध्ये देशाचा पुढचा पंतप्रधान शेतकरीच असेल,’ असा ठाम विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी आज व्यक्त केला.
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा यांसह विविध मागण्यांसाठी देशभरातून दिल्लीत धडकलेल्या शेतकऱ्यांनी आज रामलीला मैदान ते संसद असा विराट मोर्चा काढला. सकाळी दहाच्या सुमारास निघालेला हा मोर्चा पावणेबाराच्या सुमारास संसद मार्गावर पोहोचला. तिथं या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यावेळी देशभरातून आलेल्या शेतकरी नेत्यांनी सभेला संबोधित केलं.
राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ‘हा मोर्चा म्हणजे सरकारला दिलेला अल्टिमेटम आहे. सध्याच्या शेतकरी धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे. जीएसटीसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं गेलं. त्यासाठी दोन्ही सभागृहांनी एकत्र येऊन मध्यरात्री जीएसटीला मंजुरी दिली. जे जीएसटी केलं जातं, ते शेतकऱ्यांसाठी का होऊ शकत नाही, असा सवाल करत,’ शेतकऱ्यांसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शेट्टी यांनी केली.
पंजाब, बिहार, तामीळनाडू येथून आलेल्या शेतकरी नेत्यांनीही आपल्या प्रादेशिक समस्या मांडल्या. भाजप सरकारनं दिशाभूल केल्याची भावनाही व्यक्त करण्यात आली. या मोर्च्याला दिल्लीकरांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. दिल्लीतील कलाकार, पत्रकार, विद्यार्थी व अभियंते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते.
अधिक वाचा : ISRO ने लाँच केला सर्वोत्कृष्ठ इमेजिंग सॅटेलाइट HysIS
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola