दानापूर : तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील हनुमान प्रसाद साह जनता विघालयात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बारटी पुणे मार्फत आज सदर विघालयात संविधान दिन सप्ताह साजरा करण्यात आला . सर्व प्रथम डाॅ .बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली . महाराष्ट्र शासनाच्या न्याय व विशेष सहाय्यक विभागाच्या बारटी मार्फत बारटी चे महासंचालक कैलास कणसे (भा .प्र. से.),मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे ,साहाय्यक प्रकल्प संचालक राहुल कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा समता दुत शुभांगी लव्हाळे यांनी विद्यार्थ्यांना व विघालयाचे मुख्याध्यापक यांना संविधान प्रञिकेचे वाटप केले व संविधान वाचन करून डाॅ .बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवण कार्यावर प्रकाश टाकला व विद्यार्थीनी मार्गदर्शन केले . यावेळी विघालयाचे मुख्याध्यापक श्री .श्रीराम डाबरे ,पञकार सुनिलकुमार धुरडे , विनोद सगणे, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर माकोडे यांनी केले.
अधिक वाचा : विदर्भातून प्रथम आलेल्या सचिन थाटे यांचा मुंबई येथे उध्दव ठाकरे यांच्या हस्ते जाहीर सत्कार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola